InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

धनंजय मुंडेंकडून या कारणाने राज ठाकरेंचे कौतूक

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भूमिका नक्कीच लोकांमध्ये प्रभाव पाडत आहे. वेगवेगळ्या भागात राज ठाकरेंच्या सभा होत आहेत, या सभांमुळे 8 ते 10 टक्के मतदारांममध्ये प्रभाव जाणवेल. कारण, राज ठाकरे व्हीडिओच्या माध्यमातून जे भाषण करत आहेत ते म्हणजे, हा सूर्य आणि हा जयद्रथ असेच असल्याचं विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंनी म्हटले आहे.

शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना मनसेअध्यक्ष राज ठाकरेंच्या व्हीडिओ भाषणाबाजीला कस-पेस्टचं राजकारण म्हटले आहे. राज ठाकरेंना आम्ही पॉझिटीव्ह गोष्टी दाखवतो, त्यांनी आमच्यासोबत त्यांचा माणूस पाठवावा, म्हणजे डिजीटल गावची दुसरी बाजू त्यांना दिसेल. तर, राज ठाकरेंनी कट पेस्टचा राजकाणार सोडावं, सलग ठोस भूमिका घ्यावी, असा सल्लाही विनोद तावडेंनी राज ठाकरेंना दिला आहे. तर धनंजय मुंडेंनी बीड मतदारसंघातील मतदान केंद्रावर जाऊन मतदान केल्यानंतर माध्यमांशी बोलताना मुंडेंनी राज ठाकरेंच्या भाषणाचे कौतूक केले.

महत्त्वाच्या बातम्या –

 

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply