InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

लोककल्याणकारी राजा ‘छत्रपती राजर्षी शाहू महाराज’

छत्रपती राजर्षी शाहू महाराज लोककल्याणकारी राजा होते. बहुजनांना शिक्षण, जातिभेद निर्मूलन, नोकऱ्यांमध्ये आरक्षण आणि स्त्रीमुक्तीसाठी कायदे करणारे सुधारणावादी समाजसुधारक होते. आरक्षणाचे जनक, समतावादी लोकराजे राजर्षी शाहू महाराज हे २० वर्षांचे असताना कोल्हापूर संस्थानचे राजे झाले. कोल्हापूर संस्थानची गादी हाती आल्यानंतर त्यांनी सामाजिक सुधारणांचे कार्य केले.

आज २६ जून रोजी त्यांच्या 145 व्या जयंती निमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी अख्खी कोल्हापूर नगरी शाहू जन्मस्थळावर उपस्थित राहिली. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील त्याचबरोबर जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींनी शाहू महाराज यांना अभिवादन केले.

यंदाच्या जयंतीचे वैशिष्ट्य म्हणजे शाहू महाराजांचे मूळ छायाचित्र कोल्हापूरकरांना पाहायला मिळाले आहे. शाहू जन्मस्थळावर अभिवादन केल्यानंतर दसरा चौक या ठिकाणी असलेल्या शाहू महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर विविध संदेश देणारे चित्ररथांची कोल्हापूरच्या मुख्य मार्गावरून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी खूप मोठा सहभाग घेऊन आपल्या कला सादर केल्या. ढोल ताशांच्या गजरात ही मिरवणूक निघाली.

छत्रपती शाहू महाराज यांनी  बहुजन समाजातील लोकांना शिक्षण घेता यावे यासाठी अथक प्रयत्न केलेत. शिक्षणाद्वारे जातिभेद निर्मूलनासाठी प्रयत्न केले. त्यासाठी शिक्षण संस्था निर्माण केल्या. त्यांना सरकारी अनुदाने दिलीत. बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी सरकारी नोकऱ्यामध्ये राखीव जागांची तरतूद केली. त्यामुळे या जयंतीनिम्मित चंद्रकांतदादा पाटील यांनी खासदार संभाजीराजेंनी मोफत शिक्षणाच्या केलेल्या मागणीचा सकारात्मक विचार केला जाईल असं आश्वासन दिलं.

चंद्रकांत पाटील म्हणाले, “खासदार छत्रपती संभाजी महाराजांशी विविध विषयावर चर्चा झाली. विद्यार्थ्यांना मोफत शिक्षणासाठी सरकार नेहमी प्रयत्नशील असतं. गरीब विद्यार्थ्यांची मेडीकलची आर्धी फीही सरकार भरतं. शक्य तिथे आपण विद्यार्थ्यांना मदत करतो”.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply