Rajasthan Travel Guide | राजस्थानला भेट देण्याचा विचार करत असाल, तर ‘या’ शहरांना नक्की द्या भेट

Rajasthan Travel Guide | टीम महाराष्ट्र देशा: सध्याचे वातावरण राजस्थानला भेट देण्यासाठी सर्वोत्तम आहे. त्याचबरोबर या महिन्यात राजस्थानमध्ये अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या कार्यक्रमांमध्ये तुम्हाला तेथील कला आणि संस्कृतीची ओळख होईल. त्यामुळे तुम्ही या वीकेंडला राजस्थानला फिरायला जाण्याचा प्लॅन बनवू शकतात. तुम्ही जर राजस्थानला फिरायला जाण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. कारण या बातमीच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला राजस्थानमधील उत्कृष्ट ठिकाणांबद्दल माहिती सांगणार आहोत. राजस्थानला फिरायला जाण्याचा विचार करत असाल, तर पुढील ठिकाणांना नक्की भेट द्या.

पुष्कर

राजस्थानमधील पुष्कर शहर अजमेरपासून काही मिनिटांच्या अंतरावर स्थित आहे. पुष्कर शहर उंट महोत्सवासाठी जगभर प्रसिद्ध आहे. या ठिकाणी तुम्हाला 52 घाट आणि 400 लहान-मोठे मंदिर बघायला मिळतील. पुष्करमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे तलाव देखील बघायला मिळतील. तुम्ही जर राजस्थानला भेट देण्याचा विचार करत असाल तर तुम्ही पुष्करला नक्की भेट दिली पाहिजे.

मांडवा

मांडवा हे राजस्थानमधील लहान आणि शांत शहर आहे. मांडवा कलादालनांसाठी प्रसिद्ध आहे. या शहरामध्ये अनेक ऐतिहासिक वास्तू आहेत. या वास्तुद्वारे तुम्हाला तेथील संस्कृतीची ओळख होईल. इतिहास, कला आणि स्थापत्यकलेची आवड असणाऱ्यांनी या ठिकाणाला नक्की भेट दिली पाहिजे. सध्याचे वातावरण मांडवाला भेट देण्यासाठी उत्तम आहे.

उदयपूर

तलावांचे शहर म्हणून ओळख असलेले उदयपूर शहर फिरण्यासाठी एक सर्वोत्तम ठिकाण आहे. उदयपूरमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे राजवाडे बघायला मिळतील. त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला अनेक तलाव बघायला मिळतील. या तलावांच्या किनारी बसून, तुम्ही सर्वोत्तम संध्याकाळचा अनुभव घेऊ शकतात.

महत्वाच्या बातम्या

You might also like

Comments are closed.