Raju Shetti | “पन्नास हजार रुपये तुमच्या पन्नास खोक्यांपुढे…”; अब्दुल सत्तारांच्या ‘त्या’ वक्तव्यावरून राजू शेट्टी आक्रमक
Raju Shetti | कोल्हापूर : परतीच्या पावसाने राज्यभर धुमाकूळ घातला आहे. यामध्ये शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला. या पार्श्वभूमीवर स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील काही भागाची पाहणी केली. यावेळी अस्मानी व सुल्तानी संकटामुळे शेतकऱ्यांना 1 रूपया म्हणजे गाडीच्या चाकासारखा वाटू लागला आहे. याची किंमत 50 खोकेवाल्यांना कधी समजणार? असा प्रश्न राज्य सरकारला विचारला आहे. सोबत कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या वक्तव्याचाही समाचार राजू शेट्टी यांनी घेतला.
या अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका हा सोयाबीन, कापूस आणि बाजरी या पिकाला बसला आहे. विरोधकांकडून राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होत आहे. तर दुसरीकडे मात्र कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्यासारखी स्थिती नसल्याचं म्हटलं आहे. अब्दुल सत्तार यांच्या या वक्तव्यावरून शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी त्यांना चांगलंच सुनावलं आहे.
नेमकं काय म्हणालेत राजू शेट्टी?
राजू शेट्टी यांनी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. आमचे कृषीमंत्री म्हणतात राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्यासारखी परिस्थिती नाही. 20 गुंठे जमीन असणाऱ्या एका छोट्या शेतकऱ्याला पन्नास हजार रुपये हे डोंगराएवढेच असतात. त्याला एक रुपया गाडीच्या चाका एवढा असतो. मात्र हे पन्नास हजार रुपये तुमच्या पन्नास खोक्यांपुढे कमी असतील असा टोला राजू शेट्टी यांनी अब्दुल सत्तार यांना लगावला आहे. त्यानंतरही तुम्ही शेतकऱ्यांची व्यथा समजून घेणार नसाल तर या शेतकऱ्यांच्या डोक्यात आग भडकल्याशिवाय राहणार नाही. त्यामध्ये कोणकोण भस्म होईल हेही सांगता येणार नाही, असा इशाराही त्यांनी दिलायं.
महत्वाच्या बातम्या :
- Keshav Upadhey | “…पण काही प्रश्नांची उत्तरे ही द्या”, केशव उपाध्ये यांचे उद्धव ठाकरेंना सवाल
- Uddhav Thackeray | “भाजपच्या मेहरबानीवर एकनाथ शिंदेंचे मुख्यमंत्री पद टिकून आहे”
- IND vs PAK | मेलबर्नमध्ये भारत-पाकिस्तान महामुकाबला, सामन्याच्या वेळेपासून ते प्लेइंग 11, जाणून घ्या प्रत्येक अपडेट
- BJP | “2024 मध्ये महाराष्ट्रात भाजपचा पराभाव होणार”, भाजपच्या ‘या’ बड्या नेत्याचं भाकीत
- Saamana | “शेतकऱ्यांनी गावं विकायला काढलीत, राज्यपालजी, आपल्याला माहितीय का?”, सामनामधून भगतसिंह कोश्यारी यांच्यावर निशाणा
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.