Raju Shetty | “मुलगा पेपर लिहिणार आणि बाप तपासणार तसंच…”, राजू शेट्टींचा शरद पवारांवर घणाघात

Raju Shetty | मुंबई : इंदापूर येथील एका कार्यक्रमात माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetty) यांनी राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एकत्र येण्याचे आवाहन केलं आहे. एवढंच नाही तर यावेळी त्यांनी राष्ट्रवादी (NCP) पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर देखील निशाणा साधला. 15 ऑक्टोबरपासून ऊस गळीत हंगाम सुरू झाला आहे. दरम्यान राज्यातील साखर कारखानदारांनी एफआरपी दोन तुकड्यात देण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्याचे नुकसान होणार असल्याने माजी खासदार राजू शेट्टी यांनी राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एकत्र येण्याचं आव्हान केलं आहे. तसेच 7 नोव्हेंबरला साखर संकुलावर मोर्चाचं नियोजन देखील करण्यात आलं आहे.

7 नोव्हेंबरला पुणे येथील साखर संकुलावर राज्यातील कारखानदारांच्या विरोधात मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चा बारामती तालुक्यातून मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी एकत्र येण्याचे आवाहन शेट्टी यांनी केले. याचबरोबर यंदाच्या गळीत हंगामात एफआरपीचे दोन तुकडे करण्याचा घाट कारखानदार करत आहेत. यासाठी शेतकऱ्यांनी एकजूट दाखवली पाहिजे, असं राजू शेट्टी म्हणाले.

दरम्यान, गेल्यावर्षी तुटलेल्या उसाला एफआरपी पेक्षा 200 रुपये दर मिळाला पाहिजे अशी आमची मागणी आहे. जर पैसे दिले नाहीत तर 17 आणि 18 तारखेला ऊसतोड बंद करणार असल्याचा इशाराही शेट्टी यांनी दिला. तसेच यावर्षी 350 रुपये एफआरपी पेक्षा जास्त कारखानदारांनी दिले पाहिजे. इथेनॉलला 63 रुपये मिळायचे आता 65 रुपये दर मिळतो आहे. यामुळे कारखानदारांना याचा फायदा आहे. जर कारखानदारांना फायदा होत असेल तर शेतकऱ्यांनाही याचा फायदा झाला पाहिजे, असं देखील ते म्हणाले आहेत.

मुलगा पेपर लिहिणार आणि बाप पेपर तपासणार तसेच पोरगा कारखाना चालवणार आणि बाप त्याचे पर्यवेक्षण करणार ते परिवेक्षण कसं नीट होईल, असा घणाघात शेट्टींनी शरद पवारांवर केला आहे.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.