कोरोनाचा त्रास वाढल्याने राजू शेट्टी उपचारासाठी पुण्यात दाखल !

कोल्हापूरचे माजी खासदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांना उपचारासाठी पुण्याला नेण्यात आले आहे. अस्वस्थ वाटू लागल्यामुळे राजू शेट्टी यांना पुण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. राजू शेट्टी यांना दोन दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली.

राजू शेट्टी यांचा कोरोना चाचणी अहवाल मंगळवारी (8 सप्टेंबर) पॉझिटिव्ह आला होता. सुरुवातीला त्यांच्यावर कोल्हापूरमध्ये घरीच उपचार करण्यात आले, मात्र त्रास वाढल्याने त्यांना पुण्याला नेण्याचा निर्णय घेण्यात आला.

राजू शेट्टी यांना पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. शेट्टी यांना काल अ‍ॅम्ब्युलन्सने पुण्याला नेण्यात आले.

महत्वाच्या बातम्या :-

मोदींना जाब विचारण्याची हिंमत आहे का? मुख्यमंत्र्यांचा भाजपला खडा सवाल

कोरोना काळात आंदोलन केलेल्या शिवसेनेच्या आंदोलकांवर कारवाई होणार का ?

मुंबई काय शिवसेनेच्या बापाची आहे का? भाजपा नेत्याचा खडा सवाल

कंगना राणावतला मुंबईत राहण्याचा अधिकार नाही ; गृहमंत्री संतापले

ना डरूंगी ना झुकूँगी’ म्हणत कंगना रनौत मुंबईला रवाना !

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.