InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

….तर कृषीमंत्रीपद स्वीकारण्यास आम्ही तयार – राजू शेट्टी

- Advertisement -

राज्यात नव्याने स्थापन झालेल्या महाविकास आघाडी सरकारमध्ये कृषीमंत्रीपद स्वीकारण्यास स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी तयारी दर्शवली आहे. गेल्या काही दिवसांपासून राजू शेट्टी राज्याचे नवे कृषीमंत्री होतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. या चर्चांवर राजू शेट्टी यांनी आता आपली प्रतिक्रिया दिली आहे.

‘समोरून सन्मानजनक प्रस्ताव आल्यास आपण नक्की राज्याचं कृषीमंत्री स्वीकारू आणि शेतकऱ्यांचे सर्व प्रश्न मार्गी लावू,’ अशी इच्छा स्वाभिमानीचे शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी व्यक्त केली आहे. शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस या तीन मुख्य पक्षांच्या सरकारमध्ये राजू शेट्टी यांची स्वाभिमानी शेतकरी संघटनादेखील सामील आहे. त्यामुळे मंत्रिपदासाठी राजू शेट्टी यांच्याही नावाचा विचार होऊ शकतो.

Loading...

- Advertisement -

Loading...

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.