InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

राजू शेट्टी यांचा वाखरी ते पंढरपूर असा पायी प्रवास; विठूरायाचं घेतलं दर्शन

- Advertisement -

विधानसभेच्या निवडणुका जवळ येत असतानाच आता राजकीय वातावरण तापायला सुरूवात झालीय. लोकसभेतल्या पराभवानंतर राजू शेटी यांनी सावध पावलं टाकायला सुरुवात केलीय. काही दिवसांपूर्वीच त्यांनी राज ठाकरे यांची भेट घेऊन चर्चा केली होती. आता त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला इशारा दिलाय. आघाडीबाबत ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंत निर्णय न घेतल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटना एकला चलो रे ची भूमिका घेणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

वाखरी ते पंढरपूर असा पायी प्रवास करुन त्यांनी विठूरायाचं दर्शन घेतलं. सरकारविरोधातला रोष टिकवून ठेवण्यासाठी मनसे, वंचित आघाडीसह काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्र लढले पाहिजे असं मतही माजी खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केलं. लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान आघाडीच्या जागावापाचं गुऱ्हाळ खूपच रखडलं होतं. त्यामुळे शेवटपर्यंत जागांचा घोळ झाला आणि त्याचा प्रचारावर प्रतिकूल परिणाम झाला.

- Advertisement -

महत्वाच्या बातम्या-

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.