हैदराबाद प्रकरणातील आरोपींना द्या ‘ही’ शिक्षा – राखी सावंत

बुधवारी रात्री बेपत्ता झालेल्या २६ वर्षीय डॉक्टर तरुणीचा जळलेला मृतदेह गुरुवारी सकाळी हैदराबादजवळ आढळला. या घटनेचा संपूर्ण देशात संताप व्यक्त होत आहे. आंदोलनांच्या माध्यमातून या प्रकरणातील आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा देण्याची मागणी होत आहे. दरम्यान अभिनेत्री राखी सावंत हिनेसुद्धा या प्रकरणातील आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा देण्याविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती केली आहे.

बॉलीवूडकरसुद्धा या प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी म्हणून मागणी करत आहेत. याप्रकरणी राखीने एका व्हिडीओद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या प्रकरणातील ४ आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा करण्याची विनंती केली आहे. ती म्हणाली की, “तालिबानमध्ये बलात्कार प्रकरणातील नराधमांना जशी कठोर शिक्षा करण्यात येते. अगदी तशीच कठोर शिक्षा याप्रकरणी आपल्या देशात सुद्धा झाली पाहिजे. हैदराबाद प्रकरणातील त्या ४ नराधमांचे गुप्तांग कापण्यात यावे अशी मागणी राखीने यावेळी केली आहे.

 

बलात्काऱ्यांना 'ती' शिक्षा द्या राखी सावंत

बलात्काऱ्यांना 'ती' शिक्षा द्या राखी सावंत

आपलं महानगर – My Mahanagar ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಮಂಗಳವಾರ, ಡಿಸೆಂಬರ್ 3, 2019

 

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.