जॅकलिनच्या ‘पाणी पाणी’ गाण्याच्या रिहर्सल व्हिडीओवर राखी सावंतची भन्नाट कमेंट, म्हणाली..

मुंबई : अभिनेत्री जॅकलिन फर्नांडीस लोकप्रिय गायक आणि रॅपर बादशाह आणि यांच पानी पानी हे गाणं नुकतचं प्रदर्शित झालं आहे. दरम्यान, जॅकलिनने आता त्या गाण्याचा रिहर्सलचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओवर बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंतने एक मजेशीर कमेंट केली आहे.

जॅकलिन फर्नांडीसने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत जॅकलिन तिचे कॉरिओग्राफर्स शाहिजा आणि पीयूषसोबत डान्स करताना दिसतं आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओला आता पर्यंत ९ लाख पेक्षा जास्त लोकांनी लाइक केलं आहे.

जॅकलिनच्या या व्हिडीओवर सेलिब्रिटींपासून चाहत्यांपर्यंत अनेकांनी कमेंट करत तिची स्तुती केली आहे. तर सगळ्यांच लक्ष हे राखी सावंतच्या कमेंटने वेधले आहे. “अप्रतिम, माझं पाणी निघालं जॅकलिन तू खरचं अप्रतिम डान्सर आहेस,” अशी मजेशीर कमेंट राखीने केली आहे.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा