InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

रेखाताई खेडेकर यांनी पुन्हा भाजपकडे उमेदवारी मागितली

गेली  विधानसभा निवडणूक राष्ट्रवादीकडून लढविलेल्या रेखाताई खेडेकर यांनी पुन्हा भाजपकडे उमेदवारी मागितली आहे. त्या चिखली या आपल्या मूळच्या विधानसभा मतदारसंघातून पुन्हा लढण्यास इच्छुक आहेत.

खेडेकर या भाजपकडूनच चिखलीतून तीन वेळा आमदार झाल्या होत्या. गेल्या निवडणुकीत पक्षाने त्यांना उमेदवारी नाकारल्याने त्यांनी सिंदखेडराजा मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविली होती. त्यांना तेथे पराभवाचा सामना करावा लागला. आता भाजपची ताकद वाढल्याने त्यांनी पुन्हा याच पक्षाकडे चाचपणी सुरू केली आहे.

आपण मूळच्या भाजपच्या असल्याने आणि भाजपची त्या काळी एवढी ताकद नसताना आपण येथून विजय मिळवला असल्याने या वेळी आपल्या नावाचा विचार व्हावा, अशी विनंती त्यांनी पक्षाच्या नेत्यांकडे केली आहे.

गेल्या दोन निवडणुकांत चिखली मतदारसंघातून काॅंग्रेसचे आमदार राहुल बोंद्रे यांनी विजय मिळवला आहे. दुसरीकडे भाजपमध्ये या मतदारसंघासाठी तीव्र चुरस आहे. या स्पर्धेत खेडेकर यांचीही भर पडली आहे. त्यामुळे येथील आधीचे इच्छुक आणि त्यात खेडेकर यांच्यासारख्या दिग्गज महिला नेत्याने भाजपकडून प्रयत्न सुरू केल्याने येथील उमेदवारीसाठी मोठी स्पर्धा होणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply