Ram Kadam | “…तोपर्यंत मी डोक्यावरचे केस कापणार नाही”; राम कदम यांनी घेतली शपथ

Ram Kadam | मुंबई : भाजपचे आमदार राम कदम (Ram Kadam) यांनी मुंबई महानगरपालिकेवर आरोप केले आहेत. मुंबई मनपाच्या निष्काळजीपणामुळं पाणी मिळत नसल्याचं ते म्हणालेत. तसाच तुटवडा घाटकोपरच्या डोंगराळ भागात असल्याचं त्यांनी सांगितलं.

“माझा घाटकोपर पश्चिम हा मतदारसंघ डोंगराळ आहे. लोकसंख्या वाढली. सिंगल घराची डबल घरं झाली. अनेकांनी स्वतःची घरं पाण्याविना चालवावं लागतंय”, अशी व्यथा राम कदम यांनी मांडली.

त्याचबरोबर मुंबईत महापालिकेच्या निष्काळजीपणामुळं पाण्याचा तुटवडा आहे. लोकं निवडून देतात. पण, तरीसुद्धा त्यांना मुबलक पाणी देऊ शकत नाही. तर मग निवडून येण्याचा उपयोग काय?, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

यावेळी बोलताना त्यांनी डोंगरावरच्या प्रत्येक घराला मुबलक पाणी मिळत नाही तोपर्यंत मी माझ्या डोक्याचे केस कापणार नाही, अशी शपथ घेतली आहे. मुंबई मनपाच्या निष्काळजीपणामुळं पाणी मिळत नाही. त्यामुळं आमचं सरकार आहे. मंत्री महोदयांचा पाठपुरावा करून घेऊन मी ते उपलब्ध करून घेणार आहे. पण, नैतिक जबाबदारी म्हणून मी ही शपथ घेत असल्याचं त्यांनी सांगितलं.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed.