Ram Kadam | “नागपुरात भाड्याची गर्दी जमणार नसल्यानेच मुंबईत मोर्चा”; राम कदमांचा ‘मविआ’ला खोचक टोला 

Ram Kadam | मुंबई : मुंबईत आज क्रूडास कंपनी ते टाइम्स ऑफ इंडिया इमारतीपर्यंत महाविकास आघाडीचा मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. या आघाडीतील महत्त्वाचे नेते आणि लाखोंच्या संख्येने कार्यकर्त्यांचा  सहभाग आहे. दरम्यान, या मोर्च्यावरून भाजपा नेते राम कदम (Ram Kadam) यांनी ट्वीट करत महाविकास आघाडीला टोला लगावला आहे.

सोमवारपासून नागपूरमध्ये विधानसभेचे हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. आजपर्यंतचा इतिहास बघितला, तर विरोधी पक्ष असो किंवा कोणतीही संघटना असो, त्यांनी जिथे अधिवेशन आहे, तिथेच मोर्चा काढला आहे. मात्र, महाविकास आघाडी आता केवळ काही जिल्ह्यांपूरती शिल्लक राहिली असल्याचं राम कदम यांनी म्हंटल आहे.

“कदाचित नागपूरमध्ये भाड्याची गर्दी जमणार की नाही, ही शंका असल्यानेच हा मोर्चा नागपूरऐवजी मुंबईत मोर्चा काढण्यात येतोय की काय?”, अशी बोचरी टीका राम कदम (Ram Kadam) यांनी महाविकास आघाडीवर केली आहे.

पुढे ते म्हणाले, “बाळासाहेब ठाकरे यांचे संपूर्ण आयुष्य काँग्रेस-राष्ट्रवादीच्या विरोधात लढण्यात गेले. मात्र त्याच काँग्रेस राष्ट्रवादीच्या मागे आज त्यांचा मुलगा आणि नातू फरफटत चालले आहेत. त्यांना काय वाटत असेल? त्यामुळेच बाळासाहेबांचा विचार पुढे नेणाऱ्या एकनाथ शिंदे यांना बाळासाहेब आशीर्वाद देत आहेत.”

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed.