Ram Kadam | “महाविकास आघाडीच्या नेत्यांची नार्को टेस्ट करा”; ‘त्या’ प्रकरणावरून राम कदम यांची मागणी

Ram Kadam | मुंबई : C-295 या मालवाहू विमानांची बांधणी करणारा ‘टाटा एयरबस प्रकल्प’ (Tata AirBus Projec) महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेला आहे. IAF सौद्यांतर्गत महाराष्ट्रात सुरू होणारा टाटा एअरबस प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातमधील वडोदरा येथे स्थलांतरित झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी वडोदरा येथे या प्लांटचे उद्घाटन करणार आहेत. वेदान्त-फॉक्सकॉन, बल्क ड्रग पार्कनंतर टाटा एअरबसचा मोठा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेल्यानंतर राज्यात सत्ताधारी विरुद्ध विरोधीपक्षातील वाद अजूनच पेटलेला दिसत आहे.

२२,००० कोटी रुपयांचा टाटा-एअरबस सी-२९५ ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट मॅन्युफॅक्चरिंग प्लांट (Tata-Airbus Aircraft) आता गुजरातमधील वडोदरा येथे सुरू होणार असल्याची घोषणा गुरुवारी करण्यात आली. महाराष्ट्राचे उद्योगमंत्री उदय सामंत आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना वडोदरामध्ये आलेला हा प्रकल्प नागपूरच्या मिहानमध्ये आणला जाईल अशी अपेक्षा होती. या एकट्या प्रकल्पामुळे राज्यात सुमारे ६००० प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होण्याची अपेक्षा होती. याआधीही ३ मोठे प्रकल्प महाराष्ट्रातून इतर राज्यात गेले. दरम्यान, यावरून आता भाजपा नेते राम कदम (Ram Kadam) यांनी विरोधी पक्षातील नेत्यांची नार्कोटेस्ट करावी, अशी मागणी केली आहे.

काय म्हणालेत राम कदम? (Ram Kadam)

“एअरबस आणि वेदान्त-फॉक्सकॉनवर खोटं बोलणाऱ्या प्रमुख सर्वच विरोधी पक्षांच्या नेत्यांची नार्कोटेस्ट करावी, वेदान्त फॉक्सकॉनच्या टीमने तळेगावला जागा निश्चित करू सुद्धा त्यांना इतर राज्यात का जावे लागले? त्यांच्याकडून कोणी आणि किती टक्केवारी, कमिशन मागितले? कोणत्या पंचतारांकित हॉटेलमध्ये बैठक झाली? बैठकीला कोण-कोण उपस्थित होते? असे प्रश्न राम कदम यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना विचारले आहे. जर या नेत्यांची नार्कोटेस्ट केली तर सर्व वसुलीच्या कहाण्या समोर येतील”, असा दावाही त्यांनी ट्विटच्या माध्यमातून केलाय.

“सत्तेच्या काळात ज्यांनी छोट्या मोठ्या हॉटेलवाल्यापासून कॉन्ट्रॅक्टरपर्यंत आणि बदल्यामध्ये किती कोटी रुपये घायचे, याची यादी बनवली. ज्यांनी पोलिसांना सुद्धा सोडलं नाही. ते कोटींचे प्रकल्प काही वसुली न करता सोडतील का?” असा टोलाही त्यांनी महाविकास आघाडीला लगावला आहे. दरम्यान, या संदर्भात पुढे काय होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.