प्रत्येकवेळी संयमाची सबुरीची भाषा हिंदू बांधवांनाच का सांगायची?,दहीहंडीला परवानगी नाकारल्याने राम कदम आक्रमक

मुंबई : कोरोनामुळे गेले २ वर्षे झाली सर्व सण उत्सवांवर बंदी घालण्यात आली आहे. आगामी काळात दहीहंडी उत्सवाला मुंबईसहीत महाराष्ट्रामध्ये राज्य सरकारने परवानगी नाकारली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्रातल्या गोविंदा पथकांच्या प्रतिनिधीसोबत घेतलेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. यावरून विरोधक आक्रमक झाले असून भाजपा नेते राम कदम यांनी ठाकरे सरकारवर कडाडून टीका केली आहे.

“काहीतरी नियम घालून द्या, पण उत्सव सरसकट रद्द करू नका, असे राम कदम यांनी म्हटले. आम्हाला नियमांबद्दल काहीच म्हणायचे नाही. आम्ही नियम पाळायला तयार आहोत. मात्र, प्रत्येकवेळी संयमाची सबुरीची भाषा हिंदू बांधवांनाच का सांगायची?” अशी प्रतिक्रिया दहीहंडी उत्सवाच्या निर्णयासंदर्भात बैठक सुरू असताना राम कदम यांनी ट्विट करत व्यक्त केली.

पुढे कदम म्हणाले की, “आम्ही दहीहंडी साजरी करणार म्हणजे करणारच. हा हिंदूंचा उत्सव आहे. जेव्हा हिंदूंचे उत्सव येतात, तेव्हा आम्हाला सबुरीचे सल्ले. मात्र, इतरांचे उत्सव येतात, तेव्हा त्यांना परवानगी दिली जाते. हा दुटप्पी न्याय कसा?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा