‘राम कदम यांना एकदा तरी तुरुंगात टाका त्याशिवाय त्यांचे डोके ठिकाणावर येणार नाही’

मुंबई : पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण करणाऱ्या आरोपींची सुटका करण्यासाठी भाजप आमदार राम कदम यांनी फोन केल्याची एक ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. राम कदम आणि पोलीस कॉन्स्टेबलमध्ये झालेल्या या संभाषणात राम कदम आरोपींची सुटका करण्यास सांगत आहेत. पवई पोलीस ठाण्यातील कॉन्स्टेबल नितीन खैरमोडे यांना आरोपींनी मारहाण केली होती. त्या आरोपींच्या सुटकेसाठी राम कदमांनी हा फोन केल्याचं या ऑडीओ क्लिपमध्ये आहे.
याशिवाय ते भाजपाच्या आयटी सेल आणि इतर विभागांमध्येही काम करतात.पोलिसांला मारहाण करणाऱ्या आरोपींना सोडवण्यासाठी पोलिसांनाच फोन करणाऱ्या भाजप आमदार राम कदम यांच्याविरोधात युवासेना आक्रमक झाली आहे. राम कदम यांनी आरोपींना सोडवण्यासाठी पोलिसांना फोन करण्याचा प्रकार समोर आल्यानंतर आज (१२ जानेवारी) युवासेनेने मुंबईत आंदोलन करण्याची तयारी केली आहे. युवासेना मुंबईतील विविध ठिकाणी आंदोलन करणार आहे.
त्यावरून इतर पक्षांच्या नेत्यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी एका चॅनेलशी बोलताना कदम यांना एकदा तुरुगांतच टाका. त्याशिवाय त्यांचे डोके ठिकाणावर येणार नाही, अशी तीव्र प्रतिक्रिया दिली. मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी आमदारांनी पोलिसांना असा फोन करणे योग्य नसल्याचे सांगत पोलिसांवर हात उगरणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनीही कदम यांनी हा प्रकार टाळायला हवा होता, असे मत व्यक्त केले आहे.
महत्वाच्या बातम्या
- पोलिसांन मारहाण करणाऱ्यांना सोडा म्हणणं दुर्दैवी, एकनाथ शिंदेंचा राम कदमांना टोला
- खळबळजनक ! राम कदमांची ऑडिओ क्लिप व्हायरल, क्लिपमधून ही गोष्ट आली समोर
- नितेश राणे चाराण्यासारख्या गोष्टी करतात, त्यांना कशाप्रकारे बोलावं याचं मला आश्चर्य वाटतंय