Ayodhya verdict: अयोध्या निकालाबाबत सुप्रीम कोर्टाचे काही महत्त्वाचे मुद्दे

अवघ्या देशभराचे लक्ष लागलेल्या अयोध्या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निर्णय दिला आहे. वादग्रस्त जागा ही रामल्ल्लाला म्हणजे हिंदूना बहाल करण्यात आली आहे. यामुळे अयोध्येत राम मंदिर बनवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अयोध्या प्रकरणाच्या निकालावर आज (9 नोव्हेंबर) सकाळी 11.15 च्या सुमारास अंतिम निर्णय दिला गेला.

“अयोध्येत राम मंदिर निर्माणासाठी नियम बनवा” असे आदेश सर्वाच्च न्यायलयाने केंद्राला दिले आहे. “एखादी ट्रस्ट स्थापन करुन राम मंदिर उभारा” असेही नमूद केले आहे. तसेच मुस्लिमांना अयोध्येत वेगळी 5 एकर जमीन मिळणार आहे.

Loading...

अयोध्या निकालाबाबत सुप्रीम कोर्टाचे महत्त्वाचे मुद्दे

 • अयोध्या प्रकरणात सहभागाचा  शिया वक्फ बोर्डाचा दावा फेटाळला
 • अयोध्या प्रकरणातील एक पक्षकार निर्मोही आखाड्याचा दावा फेटाळला
 •  रामलल्ला विराजमान पक्षकार असण्यास मान्यता
 • अय़ोध्येतील मशीद रिकाम्या जागी बांधली नव्हती
 • मशिदीच्या बांधकामाखाली सापडलेले अवशेष गैरमुस्लिम वास्तूचे
 • पुरातत्व विभागाच्या अहवालाकडे दुर्लक्ष नाही
 • इंग्रजांच्या आधीपासून सीता रसोई, चबुतरा होते
 • मात्र, १५२८ पासून मुस्लीम नमाज पठन करायचे हे सिद्ध नाही
 •  १८५६पर्यंत हिंदू आतील भागातही पूजा करत होते,
 •  इंग्रजांनी कठडा उभारल्यानंतर बाहेरील भागात पूजा करु लागले
 •  सुनी वक्फ बोर्डाला आपला दावा सिद्ध करण्यात अपयश
 • वादातील जमिनीचे त्रिभाजन अयोग्य ठरवले
 •  चबुतरा आणि परिसरावर हिंदूंचा दावा योग्य
 • मुसलमानांना पर्यायी जमीन देण्याचा आदेश
 • रामलल्ला विराजमानचा दावा योग्य
 • अयोध्येतील वादग्रस्त जमीन हिंदूंचीच
 • मुस्लिम समाजाला अय़ोध्येतच पाच एकर जमीन देण्याचे आदेश
 • अयोध्येत श्रीराममंदिर निर्मितीसाठी विश्वस्त संस्थेचे सरकारला आदेश
 •  केंद्र सरकारला विश्वस्त संस्थेच्या माध्यमातून मंदिर निर्मितीचे आदेश
 • अखेर शतकांचा संघर्ष निकाली, अयोध्येत श्रीराम मंदिर साकारणार
महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.