राम मंदिर हे आपल्या संस्कृतीचं आधुनिक प्रतिक असेल – पंतप्रधान मोदी

ज्या ऐतिहासिक सोहळ्याकडे देशवासियांचे डोळे लागले होते, तो अयोध्या नगरीतील राम मंदिर भूमिपूजन सोहळा संपन्न होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत राम मंदिर भूमिपूजन सोहळा सुफल संपन्न झाला.

नवीन शिक्षण धोरणाबाबत सचिन सावंतांना चिंता ; केंद्र सरकारला थेट सवाल

पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी साडेअकाराच्या सुमारास अयोध्येत दाखल झाले. त्यांनी हनुमान गढीला जाऊन दर्शन घेतलं. त्यानंतर त्यांनी रामलल्लाला साष्टांग दंडवत घातला. मग प्रत्यक्ष राम मंदिर भूमिपूजन सोहळ्याला सुरुवात झाली. विधीवत पूजा झाल्यानंतर मान्यवरांनी उपस्थितांना संबोधित केलं.

आनंदाची बातमी : जगातील सर्वात मोठी कंपनी विकत घेणार TikTok अ‌ॅप

मोदी भाषणात म्हणतात की , ”अनेक शतके टेंटखाली राहिलेल्या रामलल्ला यांच्यासाठी एक भव्य मंदिर उभं राहत आहे. रामजन्मभूमी आज मुक्त झाली आहे. आपल्या स्वातंत्र्य संग्रामाच्यावेळी आपलं सर्वस्व अर्पण केलं होतं. गुलामगिरीच्या काळात स्वातंत्र्यासाठी आंदोलन झालं नाही असं एकही ठिकाण नव्हतं. 15 ऑगस्टचा दिवस त्या लाखो बलिदानांचं प्रतिक आहे. त्याचप्रमाणे राम मंदिरासाठी अनेक शतकं, अनेक पीढ्यांनी अविरत, एकनिष्ठ प्रयत्न केलेत. आजचा दिवस त्या संकल्पाचंच प्रतिक आहे.”

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.