Ram Shinde | “चॉकलेटवर सगळेच…”, रोहित पवारांच्या टीकेला राम शिंदेंचा पलटवार

Ram Shinde | मुंबई : कर्जत येथील कार्यक्रमा नंतर रोहित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) नेते आणि कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी भाजप (BJP) पक्षाचे नेते राम शिंदे (Ram Shinde) यांच्यावर सडकून वार केला होता. यालाच आता राम शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

चौकशीला घाबरायचं नसतं, चूक केली तर त्याची शिक्षा भोगायची असते. चॉकलेट वाटून तुम्ही निवडून आलात म्हणजे लोकं सगळे चॉकलेट वरच गंडतात अस नाही, असं राम शिंदे म्हणाले आहेत. तसेच सामाजिक आणि राजकीय जीवनात राजकीय आरोप-प्रत्यारोप होत असतात. लोक प्रतिनिधींनी चीडायच नसतं. मी देखील जल संधारण मंत्री होतो. त्याची देखील चौकशी झाली, मी कधीही म्हटलो नाही चौकशी करू नका. परंतु आपलाच कारखाना फक्त हा शेतकऱ्यांचा हिताचा आहे. इतर कारखाने शेतकरी हिताच्या विरोधात नाहीत. त्यामुळे त्यांनी अर्धी चूक मान्य केलेली आहे. कारखाना सुरू होता अस देखील शिंदेंनी म्हटलं आहे.

दरम्यान, राम शिंदेंनी माझ्यावर कारवाईची मागणी करण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची भेट घेतली. लहानपणी छोटे मुलं चॉकटेलसाठी रडतात, तसे आमचे विरोधक करत आहेत. मात्र, कारखाना सुरु करून शेतकऱ्यांना आम्ही मदत करत आहोत. माझ्यावर कारवाई करण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना पत्र दिले. पण, राज्यात पडलेल्या ओला दुष्काळाबाबतही एखादे पत्र द्यायला हवे होते, असं म्हणत रोहित पवार यांनी राम शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे.

दरम्यान, राज्यातील यावर्षीचा ऊस गळीत हंगाम 15 ऑक्टोंबरपासून सुरु करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले होते. तरीही रोहित पवार यांच्याशी निगडीत असलेल्या इंदापूर तालुक्यातील शेटफळगडे येथील बारामती अॅग्रो कारखान्याने त्यापूर्वीच हंगाम सुरु केला होता. हा सरकारच्या आदेशाचा भंग असल्याने कारखान्याच्या संचलकांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी भाजप नेते राम शिंदे यांनी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्याकडे केली होती.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.