‘कहो दिलसे, राम फिरसे…’; राम शिंदेंचा झंजावात

जामखेड-कर्जत विधानसभा मतदारसंघातून राज्याचे नेतृत्व घडवायचे आहे. आमचं ठरलयं असे म्हणत राम शिंदे यांच्या पाठीशी मतदारांनी ताकद उभी केली आहे. जामखेड शहरासह तालुक्यातील गावोगाव, वाडी, वस्त्यांमध्ये राम शिंदे यांचा कार्यकर्त्यांसह झंजावात चालू आहे. प्रत्येक गावात कहो दिलसे, राम फिरसे असा नारा कार्यकर्ते देत आहेत. राम शिंदेंवर विश्‍वास व्यक्त करत सर्वसामान्य मतदारांचा राम शिंदे यांना पाठिंबा देतांना दिसत आहेत.

मंत्री प्रा. राम शिंदे (भाजप) व राष्ट्रवादीचे रोहित पवार (राष्ट्रवादी काँग्रेस) यांच्या उमेदवारीमुळे राज्यात सर्वाधिक चर्चेत असणार्‍या कर्जत जामखेड मतदारसंघात निवडणुक प्रचार दिवसेंदिवस हायहोल्टेज होत चालला आहे.
पून्हा मंत्रीच पाहिजे की, आमदार यावरून सोशल मीडियावरून घमासान चालू आहे. ना.राम शिंदे यांनी आपली खास यंत्रणा मैदानात उतरवली आहे. संपूर्ण मतदारसंघ भाजपमय करत कार्यकर्तेही जीवाचे रान करताना दिसत आहेत.

ना. राम शिंदे यांनी मंत्रीपदाच्या कालखंडात कोट्यावधीचा नीधी आणून सिंचनाची कामे, पाझर तलाव, साठवण तलाव, पंतप्रधान ग्रामसडक योजनेंतर्गत तालुक्यात मोठ्या प्रमाणात काम केले आहेत. कोपरा सभा, कार्नर बैठका आणि प्रत्यक्ष मतदारांच्या भेटी घेण्याचा धडाका चालू आहे.

Loading...

गेल्या पाच वर्षांत मतदारसंघात विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले आहेत. ना.शिंदे यांनी केलेल्या विकास कामांची माहिती गावोगावी सांगण्यासाठी खास तेलंगना येथून प्रचार करण्यासाठी खास एलईडी स्क्रीन असणार्‍या गाड्यांचा ताफा मतदारसंघात दाखल झाला आहे. कार्यकर्त्यांनी आमच ठरलय म्हणत कर्जत-जामखेड या दोन्ही तालुक्यांमध्ये प्रचारात आघाडी घेतली असून जास्तीत जास्त मतांनी निवडून आणण्यासाठी कार्यकर्ते जंग-जंग पछाडतांना दिसत आहेत.

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.