Ramdas Athawale। आम्हाला मनसेच्या युतीची गरज नाही; रामदास आठवलेंच्या वक्तव्याने खळबळ
Ramdas Athawale। मुंबई : गेल्या काही दिवसांपासून भाजपा-शिंदे गट आणि मनसे नेत्यांच्या भेटीगाठी वाढल्या आहेत. गणेशोत्सवादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadanvis) यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या ‘शिवतीर्थ’ निवास्थानी जाऊन भेट घेतली होती. दोन दिवसांपूर्वीच शिवाजी पार्कवर झालेल्या मनसेच्या दीपोत्सव मेळाव्यातही हे तीनही नेते एकत्र दिसले होते. त्यामुळे या सर्व भेटीगाठी म्हणजे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युतीचे संकेत तर नाहीत ना? अशा चर्चा सुरु आहेत. अशातच मनसे आमदार राजू पाटील (Raju Patil) यांनी युतीबाबत प्रतिक्रिया दिली आहे. तर दुसरीकडे केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी देखील मनसे-भाजपच्या वाढत्या संबंधांवर भाष्य केलं आहे.
रामदास आठवले यांची प्रतिक्रिया-
याबाबत बोलताना रामदास आठवले म्हणाले कि, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस हे राज ठाकरे यांच्या कार्यक्रमाला गेले असले तरी राज ठाकरे NDA मध्ये येणार नाहीत. आम्हाला तशी मनसेची आवश्यकता नाही आहे. मुंबई महापालिकेवर RPI, भाजप आणि शिंदे गटाचाच झेंडा फडकणार आहे. त्यामुळे राज ठाकरेंची आमच्या महायुतीमध्ये आवश्यकता नाही असे रामदास आठवले म्हणाले.
राजू पाटील यांची प्रतिक्रिया-
आमची सर्वांची मन जुळलेली आहेत फक्त वरतून तारा जुळले की सर्व जुळून येईल, असे विधान राजू पाटील (Raju Patil) यांनी केले आहे. त्यांच्या या विधानामुळे पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलंय. पुढे ते म्हणाले, राजकारणात विरोधक असलो तरी आम्ही दुश्मन नाही. वैयक्तिक असं काही नसतं एकमेकाला चांगले शुभेच्छा नेहमी देत असतो. दिसताना चित्र वेगळं दिसतं परंतु सगळं गोष्टी तशा नसतात राजकारण तसं नसतं तर युती करायची की नाही हे राज साहेब ठरवतील. असंही राजू पाटील म्हणालेत.
महत्वाच्या बातम्या :
- Ravi Rana । “मी फडणवीसांचा सच्चा शिपाई आहे, त्यामुळे मी त्याला भीक घालत नाही”; रवी राणांची बच्चू कडूंवर सडकून टीका
- Atul Bhatkhalkar | “मविआच्या काळात न फुटलेले घरकोंबडा ब्रॅंडचे फटाके…”; अतुल भातखळकरांचा ठाकरेंना टोला
- Navneet Rana । “उद्धव ठाकरे बांधावर गेले पण शेतात नाही”; नवनीत राणांचा टोला
- Raju Patil | युतीबाबत मनसे आमदाराचे मोठं वक्तव्य; म्हणाले, “मन जुळलेली आहेत, फक्त…”
- Shivsena | “..तर सरकारच्या खुर्चीखाली धमाका”; ठाकरेंचा शिंदे-फडणवीस सरकारला इशारा
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.