Ramdas Athawale | उद्धव ठाकरेंकडं जाण्यापेक्षा आपण भाजपकडं जाऊ; रामदास आठवलेंची नेमकी ऑफर कुणाला?

Ramdas Athawale | शिर्डी: राज्यातील राजकारणात दररोज काही ना काही घडामोडी घडत असतात. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष व नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटासोबत युती केली आहे. या युतीनंतर राज्यात पुन्हा एकदा भीमशक्ती आणि शिवशक्ती एकत्र झाली आहे. अशात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी प्रकाश आंबेडकरांना खुली ऑफर दिली आहे.

Ramdas Athawale offered Prakash Ambedkar to join BJP

रविवारी शिर्डी येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राज्यस्तरीय अधिवेशन पार पडले. यावेळी बोलताना केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी प्रकाश आंबेडकरांना खुली ऑफर दिली आहे. आठवले म्हणाले, “प्रकाश आंबेडकरांनी माझ्यासोबत यावं. मी त्यांना भाजपकडे घेऊन जातो. उद्धव ठाकरेंकडे तुम्हाला काही मिळणार नाही. त्यामुळे ठाकरेंकडे जाण्यापेक्षा आपण भाजपकडे जाऊ.”

पुढे बोलताना ते (Ramdas Athawale) म्हणाले, “प्रकाश आंबेडकर हे आमचे नेते आहे. त्याचबरोबर रिपाई ज्यांच्याकडे असते सत्ता त्यांनाच मिळते. त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांनी माझ्यासोबत यावं. आपण दोघे मिळून भाजप आणि नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यासोबत राहू.

“उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत राहू नये. प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे भाजपसोबत आले तर त्यांचे स्वागत आहे. महाविकास आघाडी दाखवतेय वज्रमूठ आणि करतेय सगळ्यांची लूट”, असही रामदास आठवले (Ramdas Athawale) यावेळी बोलताना म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

Original NEWS SOURCE – https://bit.ly/43wODUp