Ramdas Athawale | भाजप-शिवसेना जागावाटपाच्या वादावर रामदास आठवलेंचं मोठं वक्तव्य
Ramdas Athawale | नाशिक : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी जागावाटपाबाबत केलेल्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात नवा वाद उभा राहिला आहे. बावनकुळेंच्या वक्तव्यावरुन राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहे.
शिवसेना आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांना सुनावले आहे. ‘आम्ही 48 जागा लढविण्यासाठी मूर्ख आहोत का?’ असा सवाल उपस्थित केल्याने या मुद्द्यावरुन वाद चांगलाच पेटणार आहे. आता प्रश्नावर केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athwale) यांनी दोघांची समजूत काढण्याचे ठरवले आहे. रामदास आठवले आज नाशिक दौऱ्यावर असताना बोलत होते.
Ramdas Athawale talk about BJP-Shivsena seat shearing
“भाजपने मत व्यक्त केलंय मात्र आरपीआय, शिवसेना आणि भाजप सोबत राहिली तरच फायदा आहे. बावनकुळेंच्या 50 जागांच्या वक्तव्यामुळे शिवसेनेचे मंत्री नाराज असतील तर मी मध्यस्थी करून नाराजी दूर करेन. आगामी निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेसोबत आम्ही कायम राहणार आहेत”, असे रामदास आठवले म्हणाले आहेत.
“एक मंत्रीपद आणि एक एमएलसी मिळावी अशी आमची अपेक्षा असून लोकसभेसाठी भाजप आणि शिवसेनेने तीन जागा द्याव्यात, यात एक शिर्डी आणि एक मुंबई आणि एक इतर जागा मिळावी” अशी मागणी आठवले यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या-
- Sanjay Gaikwad | “पक्षश्रेष्ठींनी त्यांना समज द्यावी, आम्ही कमीत कमी…”; संजय गायकवाडांनी बावनकुळेंना सुनावले खडेबोल
- Bacchu Kadu | जागावाटपाबाबत चंद्रशेखर बावनकुळेंनी केलेल्या वक्तव्यावर बच्चू कडूंचं उत्तर, म्हणाले…
- Sanjay Shirsat | 48 जागा लढवायला आम्ही काय मूर्ख आहोत का?; संजय शिरसाटांचा पलटवार
- Ramdas Kadam | “भास्कर जाधव बांडगूळ, त्याची लायकी नाही तो नाच्या आहे, राजकारणातून..”; रामदास कदम आक्रमक
- Sanjay Raut | भाजपकडून शिंदे गटाला फक्त 48 जागा, राऊत म्हणाले; “हीच त्यांची लायकी”
Comments are closed.