Ramdas Athawale | “राहुल गांधींनी भारत जोडण्यापेक्षा काँग्रेसला जोडण्याचं काम करावं”; रामदास आठवलेंचा खोचक सल्ला
Ramdas Athawale | पुणे : भारत जोडो यात्रेमध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी थेट विनायक दामोदर सावरकर (Vinayak Damodar Savarkar) यांच्यावर टीका केली. त्यामुळे राजकीय खळबळ उडाली आहे. “तुरुंगात असताना भीतीपोटी माफीनाम्यावर स्वाक्षरी करून सावरकरांनी ब्रिटीशांना मदत केली आणि महात्मा गांधी आणि इतर समकालीन भारतीय नेत्यांचा विश्वासघात केला”, असा दावा राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केला. यामुळे आता राजकीय वर्तुळातून यावर पडसाद उमटत आहेत. यासंदर्भात केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी प्रतिक्रिया दिलीय.
सावरकर यांच्यावर टीका करणं योग्य नाही. वैचारिक मतभेद असू शकतात. परंतु, अशा प्रकारे टीका करून वेगळी परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न असतो. अशा पद्धतीची टीका करणं योग्य नसल्याचं रामदास आठवले म्हणालेत. समाजात तेढ निर्माण करणारी ही यात्रा असल्याचे ही ते म्हणाले. या यात्रेत गर्दी होतेय. कारण लोक त्यांना पाहायला येत आहेत. मात्र या यात्रेचा काही फायदा होणार नाही, असं म्हणत त्यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला.
पुढे ते म्हणाले, “काँग्रेस ही खिळखिळ झाली आहे. त्या काँग्रेसला मजबूत करणं आवश्यक आहे. काँग्रेसची अवस्था ना घरकी ना घाट की, अशी झाली आहे.” राहुल गांधी यांनी भारत जोडण्यापेक्षा काँग्रेस पक्षाला जोडण्याचं काम करावं, असा सल्ला केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी दिलाय.
राहुल गांधी यांच्या यात्रेला प्रतिसाद मिळतोय. पण त्याचे मतात परिवर्तन होणार नाही. ही भारत जोडो नाही भारत तोडो यात्रा असल्याचं सांगत रामदास आठवले यांनी राहुल गांधींच्या यात्रेवर टीका केली आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Sambhaji Chhatrapati | “राज्यपालांना महाराष्ट्राबाहेर काढा”; कोश्यारींच्या ‘त्या’ वक्तव्यावर संभाजी छत्रपती संतापले
- Urfi Javed | उर्फीची अतरंगी फॅशन! कापडाचा सोडून मोबाईलचा बनवला ड्रेस
- Bhagatsingh Koshyari । “शिवाजी तर जुन्या काळातले आदर्श, मी नव्या युगाविषयी…”; भगतसिंह कोश्यारींचं वक्तव्यं पुन्हा चर्चेत
- Sandipan Bhumre | “अंधारे पैठणमध्ये संध्याकाळी आल्या, त्यांना काय…”, संदीपान भुमरेंचा सुषमा अंधारेंवर पलटवार
- Best Mileage Bike | ‘या’ आहेत देशातील सर्वोत्तम मायलेज देणाऱ्या बाईक
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.