Ramdas Athawale | “ही तर शिवशक्ती आणि वंचित शक्ती”; ठाकरे-आंबेडकरांच्या युतीवर रामदास आठवलेंचा टोला

Ramdas Athawale | पुणे : शिवसेनेचे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीने युतीची घोषणा केली. यावरुन आता केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athwale) यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत प्रतिक्रिया दिली आहे.

“उद्धव ठाकरे किती ही प्रयत्न केला आहे. तरीदेखील आंबेडकरी मतदार आमच्यासोबत राहणार आहे. शिवशक्ति भीम शक्ति म्हणता येणार नाही. ही तर शिवशक्ति आणि वंचित शक्ती म्हणता येईल”, अशा शब्दात रामदास आठवले यांनी उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्या युतीवर टीका केली आहे.

“उद्धव ठाकरे यांच्यासोबत 18 ते 20 टक्के शिवसेना राहिली असून त्यांची ताकद क्षीण झाली आहे. त्यामुळे आता त्यांची धडपड सुरू झाली आहे. हे लक्षात घेऊन प्रकाश आंबेडकर यांनासोबत घेण्याचा निर्णय घेतला असला तरी शिवशक्ति भीम शक्ति म्हणता येणार नाही. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे असताना शिवशक्ति भीम शक्तिचा प्रयोग झाला होता”, असे रामदास आठवले म्हणाले आहेत.

“झालेल्या प्रत्येक निवडणुकीत यश मिळाल आहे. पण खरी भीमशक्ति आपल्यासोबत आहे. उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर एकत्रित आल्याने भाजप, शिंदे गट आणि आरपीआय या आमच्या महायुतीवर काहीच परिणाम होणार नाही. तसेच आम्हाला आगामी निवडणुकीत प्रचंड यश मिळणार आहे” असेही रामदास आठवले म्हणाले आहेत.

“शिंदे आणि फडणवीस सरकारचा लवकरच मंत्रीमंडळ विस्तार होईल. त्यामध्ये आरपीआयला निश्चित स्थान दिल जाईल असे आश्वासन मिळालं आहे. तसेच राज्यपाल नियुक्त 12 आमदारांमध्ये एक जागा आरपीआयला मिळावी. तसेच महामंडळ आणि विविध समित्यावर कार्यकर्त्यांना संधी देण्यात यावी”, अशी मागणी केल्याचेही रामदास आठवले यांनी सांगितले आहे.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.