Ramdas Athawale । “…तर विनायक मेटे वाचू शकले असते”; रामदास आठवलेंच मोठं विधान

Ramdas Athawale । मुंबई : शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांचे आज अपघातात निधन झाले आहे. त्यामुळे मराठा समाजावर शोककळा पसरली आहे. त्यातच आता मेटेंचा अपघात झाला आहे कि, घातपात याबाबत शंका उपस्थित केल्या जात आहेत. मेटेंना लवकर ऍम्ब्युलन्स उपलब्ध न झाल्याने त्यांचा मुत्य झाला. असा बातम्यांमुळे मेटेंचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. त्यातच आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे.

रामदास आठवले म्हणाले कि, विनायक मेटेंचं अपघाती निधन हे मनाला चटका लावणारं आहे. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आयुष्यभर संघर्ष करणारे ते नेते होते. मराठा तरुणांच्या मनावर ठसा उमटवणारे लाडके नेते होते. आरक्षणाच्या बैठकीसाठी येत असताना अपघाती निधन झालं. ते माझे अत्यंत जवळचे मित्र होते. महायुतीचे ते लोकप्रिय नेते होते. अपघात झाल्यानंतर त्यांना लवकर रुग्णवाहिका मिळाली नाही. मदत वेळेत मिळाली असती, रुग्णालयात लवकर पोहोचले असते तर ते वाचू शकले असते. अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

दरम्यान, मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील माडप बोगद्यामध्ये आज पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास विनायक मेटे यांच्या गाडीचा अपघात झाला होता. अपघातानंतर जवळपास एक तासभर मेटे यांना कुठलीही मदत मिळाली नव्हती. यानंतर मेटे यांना नवी मुंबईतील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मेटे यांच्यासह त्यांच्या बॉडीगार्ड आणि गाडी चालकाची प्रकृती गंभीर होती. दरम्यान उपचारादरम्यान मेटे यांचं निधन झालं असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनानं दिली.

महत्वाच्या बातम्या : 

 

महत्वाच्या बातम्या

Comments are closed.