Ramdas Athawale | “40 जण नाहीत चोर, संजय राऊतांनी करू नये शोर”; आठवलेंची शायरीतून टीका

Ramdas Athawale | नांदेड : महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज दुसरा दिवस, आज ठाकरे गटाचे राज्यसभा खासदार संजय राऊतांच्या (Sanjay Raut) वक्तव्याने सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली. विधानसभा सभागृहाचा आजचा दिवस हा संजय राऊतांच्या वक्तव्याने चांगलाच गाजला आहे. खासदार संजय राऊत यांनी विधीमंडळाचा उल्लेख ‘चोरमंडळ’, असा केल्याने सत्ताधाऱ्यांनी विधीमंडळात हा मुद्दा उपस्थित करत हक्कभंगाची मागणी केली आहे. यावरुन आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Ramdas Athawale Comment on Sanjay Raut’s Statement

“कोण चोर आहे, कोण तुरुंगामध्ये जाऊन आले ते सगळ्यांना माहीत आहे. ‘’हे 40 जण नाहीत चोर, संजय राऊतांनी करू नये शोर’, असं रामदास आठवले म्हणाले आहेत. राऊतांच्या वकत्व्यावर बोलताना नांदेडमध्ये पत्रकार परिषदेत रामदास आठवले (Ramdas Athawale) असे म्हणाले आहेत.

“40 आमदार हिम्मतवाले”- Ramdas Athawale

“40 आमदार हिम्मतवाले आहेत. खरी शिवसेना त्यांचीच आहे, न्यायालयाचा निकालही मुख्यमंत्री शिंदे यांच्या बाजूने लागेल”, असंही रामदास आठवले म्हणाले आहेत.

काय होतं संजय राऊतांचं वक्तव्य?

संजय राऊत हे कोल्हापूर दौऱ्यावर असताना त्यांनी ‘विधिमंडळ नाही, चोरमंडळ’ असा शब्द प्रयोग केला आहे. “ही बनावट शिवसेना आहे. ड्युप्लिकेट. चोरांचं मंडळ. चोर मंडळ. हे विधीमंडळ नाही, चोरमंडळ आहे. त्यांनी आम्हाला पदावरून काढलं तरी आम्ही पक्ष थोडीच सडणार आहे. आम्ही पक्षातच राहणार आहोत. अशी पदे आम्ही ओवाळून टाकतो”, असं संजय राऊत म्हणाले होते.

संजय राऊतांची सारवासारव

संजय राऊतांनी केलेलं हे वक्तव्य भोवण्याची शक्यता दिसत असतानाच राऊत यांनी आपल्या वक्तव्याचं स्पष्टीकरण देत सारवासारव केल्याचंही पहायला मिळालं आहे. “माझ्याविरोधात हक्कभंग आणला तर त्यावर चर्चा होईल. मी तुरुंगात गेलेला माणूस आहे, त्यामुळे हक्कभंगाच्या कारवाईला मी घाबरत नाही” अशी प्रतिक्रिया संजय राऊतांनी दिली आहे.

महत्वाच्या बातम्या-

You might also like

Comments are closed.