InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

‘उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री बनायचे आहे, तर भाजपने पाठिंबा दिला असता’

- Advertisement -

दिल्लीत सत्तास्थापनेच्या वाटाघाटी सुरु आहेत.  शिवसेनेकडून मुख्यमंत्रिपदासाठी उद्धव ठाकरे यांचं नाव चर्चेत आहे. शिवाय काँग्रेस आणि राष्ट्रवादीनेही मुख्यमंत्रिपदासाठी उद्धव ठाकरेंच्याच  नावाचा आग्रह धरल्याची माहिती आहे. अशा परिस्थितीत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. जर उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री बनायचंय हे आधी माहीत असतं तर भाजपने पाठिंबा दिला असता, असं रामदास आठवले म्हणाले

रामदास आठवले म्हणाले, “महायुतीचं सरकार यावं यासाठी मी प्रयत्न  केले. शिवसेना मुख्यमंत्रिपदासाठी आग्रही राहिली. पण भाजप ऐकत नाही हे पाहून त्यांना सत्तेबाहेर ठेवायचं हे शिवसेने ठरवलं. जर उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री बनायचे आहे हे आधी समोर आले असते, तर भाजपने पाठिंबा दिला असता”

Loading...

- Advertisement -

Loading...

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.