InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

‘अमित शहांनी सांगितलंय, भाजप – शिवसेना एकत्र येऊन सरकार स्थापन करतील’

- Advertisement -

विधानसभा निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर राज्यात सुरु झालेला सत्ता स्थापनेचा संघर्ष अजुनही सुरुच आहे. कोणत्याही पक्षाला सत्ता स्थापनेचा दावा करता न आल्यानं अखेर राज्यपालांनी राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस केली. त्यानतंर राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. दरम्यान, शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यात सत्ता स्थापनेसाठी चर्चा सुरु झाल्या आहेत. यातच भाजपकडून पुन्हा आमचंच सरकार येणार असं म्हटलं जातं आहे.

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी सांगितलं की, राज्यातील सरकार स्थापनेवरून जी परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामध्ये लक्ष घालावं अशी विनंती भाजपाध्यक्ष अमित शहांना केली. त्यावर अमित शहांनी सांगितलं की काळजी करू नका सर्व ठिक होईल. भाजप आणि शिवसेना एकत्र येऊन सरकार स्थापन करतील. रामदास आठवले यांनी असं सांगितलं असलं तरी राज्यात आणि केंद्रातील स्थिती मात्र वेगळीच आहे. राज्यात सत्ता स्थापनेसाठी भाजप आणि सेनेच्या नेत्यांमध्ये चर्चेची कोणतीच चिन्हे नाहीत. तर रविवारी भाजपकडूनच सेना एनडीएतून बाहेर पडल्याचं सांगण्यात आलं आहे.

Loading...

- Advertisement -

Loading...

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.