InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

‘शूर आम्ही आमदार आम्हाला फक्त ईडीची भीती’; रामदास फुटाणेंचे राजकारण्यांना चिमटे

- Advertisement -

‘शूर आम्ही आमदार आम्हाला फक्त ईडीची भीती’ असे विडंबन काव्य करत विडंबनकार रामदास फुटाणे यांनी मंगळवारी राजकारण्यांना चिमटे घेतले. आचार्य अत्रे यांच्या १२१व्या जयंतीनिमित्त रामदास फुटाणे यांना आचार्य अत्रे मानचिन्हाने गौरविण्यात आले. ठाण्याच्या गडकरी रंगायतनमध्ये हा सोहळा पार पडला. यावेळी फुटाणे यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले.

सध्याच्या राजकारणावर परखड भाष्य करत फुटाणे यांनी नेते, साहित्यिक आणि पत्रकार आचार्य अत्रे यांच्या आठवणी जागवल्या. कोणता नेता कोणत्या पक्षात आहे हे काही कळत नाही. काही सकाळी एका पक्षात तर संध्याकाळी दुसऱ्या पक्षात असतात. आज आचार्य अत्रे असते तर सगळ्यांना झोडपून काढलं असतं, असं फुटाणे म्हणाले.

- Advertisement -

महत्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.