Ramdas Kadam | “अजित पवारांनी विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा द्यावा अन्…”, रामदास कदमांचा घणाघात
Ramdas Kadam | मुंबई : बाळासाहेबांची शिवसेना पक्षातील नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी माजी मुख्यमंत्री तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर अतिशय बोचरी टीका केली आहे. यावेळी अजित पवार (Ajit Pawar) यांनी विरोधी पक्षनेते पदी राजीनामा द्यावा आणि ते पद उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी घ्यावं, अशी टीका त्यांनी केली आहे.
उद्धव ठाकरे यांनी अडीच वर्षांमध्ये कधीच कोणते निर्णय घेतले नाहीत, अडीच वर्षांमध्ये ते मंत्रालयात केवळ दोन तीन वेळा आले असून कोकणावर मोठे संकट आलं, चक्रीवादळ आलं, तेव्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अथवा आदित्य ठाकरे सुद्धा आले नाहीत, मात्र, राष्वादीचे अध्यक्ष शरद पवार या वयातही येथे आले आणि पाहणी केली, असं रामदास कदम म्हणाले.
आज मला आनंद झाला, उद्धव ठाकरे शेतकऱ्यांच्या बांधावर गेले, त्यांना अभ्यास किती आहे माहिती नाही, पण अजून परतीचा पाऊस सुरू आहे, पंचनामे झाले नाहीत तोपर्यंत मदत कशी देणार, असा सवाल कदम यांनी उपस्थित केला आहे. तसेच पंचनामे झाल्याशिवाय मदत देता येत नाही, असं देखील त्यांनी सांगितलं आहे.
राज्यातील शेतकरीबांधवांसमोर उभा असलेला दुःखाचा डोंगर व आदिवासी बांधवांचे प्रश्न, त्यांचे राहणीमान हे सगळे दुःख आहे. त्यामुळे मी शक्यतो दिवाळी कधी साजरी करत नाही, अशी भावना रामदास कदम यांनी व्यक्त केली आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Shambhuraj Desai | “राष्ट्रवादीला पुढील अडीच नाहीतर पंधरा वर्षे सत्तेविना तळमळत…”; शंभूराज देसाईंचा राष्ट्रवादीवर हल्ला
- MNS | “आमची मनं जुळली आहेत, बाकी सर्व जुळून येईल”
- Irfan Pathan । ‘विराटने फटाके तर कालच फोडले होते’; इरफान पठाणने शेअर केला व्हिडिओ
- IND vs PAK । फलंदाजी करताना मला खूप दडपण जाणवत होते, विराट कोहलीने केला मोठा खुलासा
- Ramdas Athawale। आम्हाला मनसेच्या युतीची गरज नाही; रामदास आठवलेंच्या वक्तव्याने खळबळ
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.