InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

अयोध्येत राम मंदिर बनेल, श्रीरामाचा वनवास आता संपला – रामदेव बाबा

- Advertisement -

अयोध्या वादावर सुप्रीम कोर्टाच्या 5 न्यायाधीशांच्या घटनापीठाने शनिवारी सकाळी साडेदहा वाजता निकाल वाचण्यास सुरुवात केली. सरन्यायाधीश रंजन गोगोई म्हणाले की, संविधान पीठ एकमताने निर्णय देत आहे. सीजेआय म्हणाले की, हिंदू हे वादग्रस्त स्थान जन्मस्थान मानतात, परंतु मालकी विश्वासाने निश्चित केली जाऊ शकत नाही. खंडपीठाने म्हटले आहे की, उद्ध्वस्त केलेली रचना ही भगवान रामाची जन्मभूमी आहे, हिंदूंचा हा विश्वास निःसंशय आहे. सर्वोच्च न्यायालयाने 6 ऑगस्ट ते 16 ऑक्टोबर या 40 दिवसांच्या कालावधीत हिंदू आणि मुस्लिम पक्षकारांचे युक्तिवाद ऐकल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने आज ऐतिहासिक निकाल दिला आहे.

- Advertisement -

Loading...

या निकालावर योगगुरू रामदेव बाबा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. रामदेव बाबा म्हणाले कि, श्रीरामाचा वनवास आता संपला आहे. अयोध्येत राम मंदिर बनेल. यावेळी आपल्याला अराजकीय तत्त्वांपासून सावधान राहण्याची गरज आहे, असे त्यांनी सांगितले आहे.

दरम्यान, निकालाच्या पार्श्वभूमीवर अयोध्यासह देशभरात सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आलेली आहे. तसेच सोशल मीडियावरून निकाला संदर्भात टीका-टिप्पणी व अफवा परसविणाऱ्या संदेश पाठविणाऱ्यांवर पोलिसांचे विशेष लक्ष राहणार आहे. सर्वपक्षीय नेत्यांनीही देशवासियांना शांततेचे आव्हान केले आहे.

Loading...

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.