Ramesh Kere । ऑडिओ क्लिप व्हायरल केली त्यांच्यावर कारवाई व्हावी; रमेश केरे यांच्या पत्नीची मागणी
Ramesh Kere | मुंबई : आज राज्यात एक खळबळजनक घटना घडली आहे. काही दिवसांपूर्वी मराठा क्रांती मोर्च्याच्या समन्वयकाची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. त्यानंतर मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक रमेश केरे-पाटील (Ramesh Kere Patil) यांनी आज फेसबुक (Facebook) लाईव्ह करून आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. माझी बदनामी केली जात आहे. मात्र, मी आजपर्यंत समाजासाठी प्रामाणिक काम केलं आहे. मात्र, आता हे माझं तुमच्याशी फेसबुकच्या माध्यमातून शेवटच संभाषण असणार आहे, असे रमेश केरेंनी आपल्या फेसबुक लाईव्हच्या माध्यमाद्वारे म्हटलं होत.
या घटनेनेनंतर रमेश केरे पाटील यांच्या पत्नी आशाताई केरे यांनी पुंडलिक नगर पोलीस ठाण्यात पोहोचून संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. ज्यांनी ज्यांनी ऑडिओ क्लिप व्हायरल केली त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणीची तक्रार यावेळी आशाताई केरे यांनी केली आहे. मुंबईतील जे जे रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांच्या पत्नी, भाऊ,मुले आणि इतर नातेवाइकांनी औरंगाबादेतील पोलीस ठाण्यात धाव घेतली होती.
नेमकं घडलं काय?
मुंबईतील चर्चगेट परिसरातील एका हॉटेलमध्ये मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक रमेश केरे-पाटील यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर त्यांना मुंबईतील जे जे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मागील काही दिवसांपासून एका ऑडिओ क्लिपमुळे मराठा क्रांती मोर्चा कार्यकर्त्यांमध्ये खळबळ उडाली होती. त्यानंतर आज रमेश केरे यांनी आज फेसबुकवर लाईव्ह करून उंदीर मारण्याचे औषध प्राशन केले. गेल्या काही दिवसांमध्ये आपल्यावर चुकीचे आरोप झाले. त्यामुळे माझी नाहक बदनामी केली आहे.
चंद्रकांत पाटील यांच्याजवळच्या माणसांनी मला त्रास दिला असा आरोप करत केरे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. मी त्यांच्या नावाला विरोध केला होता. त्यामुळे जाणीवपूर्वक मला बदनाम केले जात आहे. मी कधी असं काही केलं नाही, मी समाजासाठीच काम केलं आहे, समाजाला न्याय मिळावा यासाठी केलं आहे. त्यामुळे मी माझं आयुष्य संपवत आहे, असं म्हणत रमेश केरे यांनी औषध प्राशन केलं. यानंतर आता या सर्व गोष्टींचा तपास सुरु आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Sharad Pawar । “गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर मी जाहीर केलं होत कि…”; शरद पवारांचा मोठा खुलासा
- Sharad Pawar । अंधेरी पूर्व विधानसभा निवडणूक ही…; शरद पवारांच्या वक्तव्याने निवडणुकीचा ट्विस्ट आणखी वाढला
- Shambhuraj Desai । राष्ट्रवादीचे आमदार सोबत येण्यासाठी सकारात्मक, शिंदे गटाचा दावा
- Skin Care Tips | ‘या’ स्टेप्स फॉलो करून घरीचं करा फेशियल
- Sushilkumar Shinde | मी काय आहे दाखवण्याकरिता इंग्रजीमध्ये बोलण्याची इच्छा होती, पण …; सुशीलकुमार शिंदेंच वक्तव्य
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.