Ramesh Kere । मराठा क्रांती मोर्चा समन्वयक रमेश केरे यांचा आत्महत्येचा प्रयत्न

Ramesh Kere | मुंबई : सोशल मीडियावर माझी बदनामी केल्याच्या आरोप करत मराठा क्रांती मोर्चा समन्वयक रमेश केरे (Ramesh Kere) यांनी फेसबुक लाईव्ह दरम्यान विष प्राशन करत आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. कथित ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून माझी बदनामी केली जात आहे. मात्र, मी आजपर्यंत समाजासाठी प्रामाणिक काम केलं आहे. मात्र, आता हे माझं तुमच्याशी फेसबुकच्या माध्यमातून शेवटच संभाषण असणार आहे, असे रमेश केरेंनी आपल्या फेसबुक लाईव्हच्या माध्यमाद्वारे म्हटलं आहे.

रमेश केरे हे फेसबुक लाईव्ह (Facebook live) करत असतांना भावूक झालेले पाहायला मिळाले. मराठा बांधवांशी संवाद साधत असतांना “आशा, अक्षर भैया, गौरी मला माफ करा, मी आजवर मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळण्यासाठी प्रामाणिकपणे काम करत आलोय, मात्र सोशल मीडियावर मला जाणून बुजून बदनाम केलं जात आहे. हे माझं शेवटचं फेसबुक लाईव्ह असेल” असं म्हणत त्यांनी विष प्राशन करण्याचा प्रयत्न केला आहे.

मुंबईत रमेश केरे (Ramesh Kere) यांनी आत्महत्येचा केला प्रयत्न

‘मराठा मोर्च्यात झालेल्या आर्थिक देवाणघेवाणीची चौकशी होऊन संबंधित लोकांवर गुन्हे दाखल करावेत. तसंच ज्या लोकांनी माझ्यावर खोटे आरोप करून बदनामी करण्याचा प्रयत्न केला, त्यांच्यावरही कारवाई करण्यात यावी,’ अशी मागणी रमेश केरे पाटील यांनी केली आहे. मुंबईत त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न ( Ramesh Kere Suicide Attempt ) केला आहे. सध्या त्यांच्यावर जेजे रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मराठा क्रांती मोर्चाबाबतची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. ज्यामध्ये केरे यांच्यावर पैसे घेतल्याचा आरोप होता. ही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक रमेश केरे यांनी हे धक्कादायक पाऊल उचलले आहे. हा मराठा क्राती मोर्चासाठी मोठा धक्का मानण्यात येत आहे. मराठा मोर्च्याशी संबंधित असलेल्या रमेश केरे (Ramesh Kere) यांनी थेट फेसबुक लाईव्हवरच आत्महत्येचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलीस काय कारवाई करतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.