Ramiz Raja | भारताला पाकिस्तानचा विजय पचवता आला नाही; रमीझ राजा यांचं हास्यास्पद वक्तव्य
Ramiz Raja | टीम महाराष्ट्र देशा: पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या अध्यक्षपदावरून रमीझ राजा (Ramiz Raja) यांना हटवण्यात आलं आहे. रमीझ राजा यांच्यानंतर नजम सेठी यांनी बोर्डाची जबाबदारी स्वीकारली आहे. नजम सेठी यांनी येतात संघाच्या हंगामी मुख्य निवडकर्त्याची जबाबदारी शाहिद आफ्रिदीकडे सोपवली आहे. रमीझ राजा यांना पीबीसी अध्यक्ष पदावरून हटवल्यानंतर त्यांच्या दृष्टिकोनात काहीसा बदल झाल्याचे दिसून आले आहे. कारण त्यांनी भारताबद्दल असे काही वक्तव्य केले आहे, जे ऐकून सगळेच हैराण झाले आहे. रमीझ राजा राजा म्हणाले आहे की, पाकिस्तान विरुद्ध पराभव झाल्यानंतर भारतीय संघाचे नुकसान झाले आहे. बीसीसीआयला पाकिस्तानचा विजय पचवता आला नाही. म्हणून त्यांनी मुख्य निवडकर्ता, निवड समिती आणि कर्णधार बदलला आहे.
रमीझ राजा मीडियासोबत बोलताना म्हणाले आहे की,”मर्यादित षटकांच्या सामन्यांमध्ये आम्ही चांगली कामगिरी केली आहे. आम्ही आशिया कप खेळलो आहोत. भारतीय संघ तो खेळू शकला नाही. अब्ज डॉलरने श्रीमंत असलेला भारत मागे राहिला आहे. पाकिस्तानचा पराभव पचवता न आल्याने भारतीय संघाने मुख्य निवडकर्ता, निवड समिती आणि कर्णधार बदलला आहे.”
पुढे बोलताना रमीझ राजा म्हणाले की,”पाकिस्तानमध्ये माझ्यावर अन्याय झाला आहे. मला काढून टाकाने म्हणजे फ्रान्सने अंतिम सामना खेळून संपूर्ण बोर्ड बदलून टाकल्यासारखे आहे. मी पाकिस्तान संघाच्या कर्णधार बाबर आझमला मजबूत केले आहे.”
रमीझ राजा पुढे म्हणाले की,”मी संघाला एकत्र ठेवण्याचा पूर्ण प्रयत्न केला होता. मी कर्णधाराला त्याचे अधिकार दिले होते. क्रिकेट या खेळामध्ये कर्णधाराला महत्व देणे आवश्यक असते. कारण जर तुमचा कर्णधार उत्तम असेल तर तुम्हाला सर्वोत्तम परिणाम मिळू शकतात. आम्ही पाकिस्तान संघाला नेहमीच चांगला निकाल दिला आहे.”
पाकिस्तानने रमीझ राजा यांच्या कार्यकाळामध्ये 2021 टी-20 विश्वचषक स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली होती. तर, 2022 टी-20 विश्वचषक स्पर्धेमध्ये अंतिम फेरीत प्रवेश मिळवला होता. त्याचबरोबर या वर्षाच्या सुरुवातीला झालेल्या आशिया चषक स्पर्धेमध्ये पाकिस्तान जेतेपदाच्या लढाई पर्यंत पोहोचला होता. मात्र पाकिस्तानला या स्पर्धेचे जेतेपद आपल्या नावावर करता आले नव्हते.
महत्वाच्या बातम्या
- Amol Mitkari | कृषीमंत्री सभागृहात असताना राजीनामा का नाही मागितला? ; अमोल मिटकरींचा स्वपक्षीयांना सवाल
- Poco Mobile | भारतामध्ये लवकरच लाँच होऊ शकतो Poco चा ‘हा’ मोबाईल
- Ajit Pawar | मी राजकारणातून संन्यास घेण्याचा विचार करतोय, अजित पवारांचा बावनकुळेंना टोला
- Rahul Dravid | राहुल द्रविडची क्रिकेट कोच कारकीर्द संपणार?, BCCI ने आखला नाव प्लॅन
- Health Care Tips | सोयाबीनचे नियमित सेवन केल्याने मिळतात ‘हे’ आरोग्यदायी फायदे
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.