Ramraje Naik Nimbalkar | अधिकाऱ्याची दारू उतरलेली नसते तिथे दादा विकासाच्या कामाला हजर : रामराजे नाईक निंबाळकर

Ramraje Naik Nimbalkar | सातारा : रामराजे नाईक निंबाळकर (Ramraje Naik Nimbalkar) यांची पंचाहत्तरी साजरी करण्यात आली. त्यानिमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नेते उपस्थित होते. या कार्यक्रमाला विरोधी पक्षनेते अजित पवार ( Ajit Pawar), जयंत पाटील ( Jayant Patil) यांनी देखील हजेरी लावली. त्यावेळी रामराजे नाईक निंबाळकर यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. त्याचप्रमाणे अजित पवारांच्या कामाचं देखील कौतुक केलं आहे.

काय म्हणाले रामराजे नाईक निंबाळकर (What did Ramraje Naik Nimbalkar say)

कृष्णा महामंडळाच्या कामाला लागलो तेव्हा आमच्याकडे बजेट नव्हतं परंतु आम्हाला या भागात पाण्याचा प्रश्न सोडवायचा होता. यामुळे एकत्र येऊन काम करणं गरजेच होत. ज्या लोकांनी निवडून दिलं त्याच्या गरजा लक्षात घेऊन आलेल्या संधीचा उपयोग करून घेऊन पावलं उचलण ही आमच्या घराची परंपरा आहे. आतापर्यंत अनेक मंत्री बघितले परंतु सकाळी 6 वाजता विकासाचं काम करायला जाणार हा एकच मंत्री तो म्हणजे अजित पवार. तसचं सरकारी अधिकाऱ्याची दारू उतरलेली नसती तिथे दादा विकासाच्या कामाला हजर असतात. असं म्हणतं नाईक निंबाळकरांनी अजित पवारांच्या कामाचं कौतुक केलं आहे. आतापर्यंत सर्वांनीचं बघितलं आहे कि, अजित पवारांचं काम जनतेच्या हिताचं आणि विकासाच्या दृष्टीने महत्वाचं असतं. परंतु आता रामराजे नाईक निंबाळकरांनी देखील दादांच्या कामाला एक मोहर लावली आहे.

दरम्यान, अजित पवारांची जर साथ नसती तर कृष्णा महामंडळाची काम झाली नसती. तसचं एका काळात अजित पवारांनी स्वतःचं मंत्रिपद मला उदार मनाने दिल. अशी मंडळी आपल्या सोबत आहे यात वेगळा आनंद आहे. असं देखील निंबाळकर म्हणाले. दादा सगळ्या गोष्टींची पाहणी स्वतः करतात नंतर त्याबाबत बोलतात. याचप्रमाणे सातारा जिल्ह्यातील काही भागातील पाण्याच्या प्रश्न लवकरच मिटणार आहे. असं आश्वासन देखील त्यांनी केलं. तर स्त्री शक्तीला पाठिंबा देत त्यांना पूर्ण स्वतंत्र मिळालं पाहिजे असं देखील नाईक निंबाळकर म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-

You might also like

Comments are closed.