Rana-Kadu | राणा-कडू वाद होणार गोड? दोघेही शिंदे-फडणवीसांच्या भेटीसाठी मुंबईला
Rana-Kadu | मुंबई : रवी राणा (Ravi Rana) आणि बच्चू कडू (Bacchu Kadu) यांचा वाद (Rana-Kadu) आता मिटण्याची शक्यता आहे. कडू आणि राणा दोघेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या भेटीला मुंबईला निघाले आहेत. रवी राणा यांनी बच्चू कडूंवर खोके घेतल्याचा आरोप केला होता. यावरुन कडू प्रचंड संतापले आहेत.
नागपूरहून मुंबईला रवाना होण्यापूर्वी रवी राणा (Ravi Rana) यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघेही माझे नेते आहेत. त्या दोघांनी मला आज भेटायला बोलावले आहे. त्यानुसार मी त्यांच्या भेटीसाठी मुंबईला जात आहे, असं राणा म्हणाले.
रवी राणा यांनी १ नोव्हेंबरपर्यंत मी पैसे घेतल्याचे पुरावे सादर करावेत, असे आव्हान बच्चू कडू यांनी दिलं आहे. तसेच वेळ पडल्यास आपण शिंदे-फडणवीस सरकारमधून बाहेर पडू, असे संकेतही बच्चू कडू यांनी दिले आहेत.
दरम्यान, येत्या काही दिवसांमध्ये शिंदे-फडणवीस सरकारचा दुसरा मंत्रिमंडळ विस्तार होऊ घातला आहे. या मंत्रिमंडळ विस्तारात स्थान मिळवण्यासाठी बच्चू कडू आणि रवी राणा दोघेही उत्सुक आहेत. त्यामुळे आजच्या भेटीत शिंदे आणि फडणवीस रवी राणा यांना मंत्रिपदाचे आश्वासन किंवा तत्सम जबाबदारी देणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Rupali Thombare | “जागे व्हा महाराष्ट्रातील लोकांनो! नाही तर…”, रुपाली ठोंबरेंच जनतेला आवाहन
- Bhaskar Jadhav | 25 पैशांच्या नाण्यावर राणेंचा फोटो लावणाऱ्याचं भास्कर जाधवांकडून कौतुक, म्हणाले…
- Gulabrao Patil | “…तर सरकार पायउतार व्हायला तयार” गुलाबराव पाटलांचं मोठं विधान
- Uddhav Thackeray | “खोक्यांना भोकं पडायला लागली…”, उद्धव ठाकरेंचा कडू-राणा वादावर टोला
- Uday Samant | “आज आदित्य ठाकरे मंत्र्यांचे राजीनामा मागत आहेत मात्र…”, उदय सामंतांनी दिलं प्रत्युत्तर
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.