कतरिना-विकी पाठोपाठ आता रणबीर-आलिया विवाहबंधनात अडकणार; वेळ, ठिकाण निश्चित

मुंबई : अभिनेत्री कतरिना कैफ आणि विकी कौशल यांच्या लग्नानंतर आता बॉलिवूडचं अजून एक जोडपं विवाहबद्ध होणार आहे. बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूर विवाहबंधनात अडकणार असल्याची चर्चा गेल्या अनेक महिन्यांपासून सुरु आहे. मात्र आता यांची लग्नाबद्दलची अचूक माहिती आता समोर आली आहे.

कोरोनाचं संकट आलं नसतं तर, केव्हाच लग्न उरकलं असतं असं वक्तव्य अभिनेता रणबीर कपूर यानं केलं. दरम्यानच्या काळात खूप काही होऊन गेलं. आता म्हणे ही जोडी अखेर पुढच्या टप्प्यावर पोहोचली आहे. अधिकृतपणे आता कपूर आणि भट्ट कुटुंब आलिया आणि रणबीरच्या लग्नाच्या तयारीला लागले असल्याचं कळत आहे.

तसेच या दोघांच्या लग्नाचा मुहूर्त बऱ्यापैकी पुढे ढकलला आहे. पुढच्या वर्षी डिसेंबर किंवा 2023 च्या जानेवारी महिन्यात त्यांची लग्नगाठ बांधली जाणार आहे. हो, आणि ते डेस्टिनेशन वेडिंग करणार नाहीत हेसुद्धा आता स्पष्ट झालं आहे. आलियाशी संलग्न सूत्रांच्या माहितीनुसार ही जोडी मुंबईतच लग्नबंधनात अडकणार आहे. ताज लँड्स एंड इथं हा विवाहसोहळा पास पडणं आता जवळपास निश्चितच झालं आहे.

महत्वाच्या बातम्या

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा