“राणेंना सूक्ष्म उद्योग खातं मिळालं, त्यामुळे त्यांचं डोकंही सूक्ष्म झालं”

मुंबई : शिवसेना नेते नेते एकनाथ शिंदे हे मंत्री असले तरी सही पुरते आहेत. मातोश्रीशिवाय ते एकही सही करू शकत नाहीत. ते कंटाळले आहेत. आमच्याकडे आले तर घेऊ, असं सांगतानाच आम्ही मनात आणलं तर लवकरच सरकारचं विसर्जन करू. शिंदे शिवसेनेत अस्वस्थ असून ते लवकरच भारतीय जनता पक्षात येतील, असे विधान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी नुकतेच केले होते.

यावर मंत्री गुलाबराव पाटील यांना पत्रकारांनी विचारले असता, त्यावर पाटलांनी आपली प्रतिक्रिया दिलीय. नारायण राणे पाहिले किती दिवस अस्वस्थ होते, हे आपण पाहिले आहे. त्यामुळे त्यांचा अस्वस्थपणा आता कुठे निघाला आहे, पहिले ते शिवसेनेत अस्वस्थ होते, नंतर काँग्रेसमध्ये अस्वस्थ झाले.आता भाजपमध्ये गेल्यानंतर त्यांना सुक्ष्म- लघु उद्योग खाते देण्यात आले आहे. त्यामुळे मिळालेल्या खात्या प्रमाणेच त्यांचे डोके देखील सुक्ष्म झाले आहे, असं पाटील म्हणाले.

दरम्यान, एकनाथ शिंदे हे शिवसेना नेते आनंद दिघे यांचे चेले आहेत. ठाणे येथे शिवसेनेचा झेंडा तेवत ठेवला त्यांचे शिंदे हे चेले आहेत. त्यामुळे नारायण राणे यांचे शिंदे यांच्याबाबत हवामान खात्याप्रमाणे अंदाज चुकीचे आहेत, असा टोलाही गुलाबराव पाटलांनी लगावला.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा