“राणेंनी शिवसेनेला लक्ष्य करून भुंकणे बंद करावे, ते फक्त शिवसेनेवर भूंकण्यासाठी आहेत”

बुलढाणा : केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी मुख्यमंत्र्यांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानानंतर नारायण राणे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात सुरू झालेला वाद वाढतानाच दिसत आहे. यानंतर चिपी विमानतळाच्या उद्घाटनावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नारायण राणे एका मंचावर आले तरीही त्यांनी एकमेकांना लक्ष्य करणं सोडलं नाही. दोघांमध्ये चांगलाच कलगीतुरा रंगल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर हा वाद सुरुच आहे.

तसेच आता मुख्यमंत्र्यांनी राज्यातील शेतकऱ्यांकडे आणि पूरग्रस्त भागाकडे लक्ष नसल्याचं म्हणत मुख्यमंंत्र्यावर जोरदार टीका केली आहे. “साडेतेरा कोटी जनतेला मुख्यमंत्री काहीही दिलासा देत नाहीत, केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करतात. मोदींवर टीका करण्याची तुमची लायकी आहे का?” असा सवाल देखील राणे यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता केला. यावेळी ते बुलढाणा येथे बोलत होते.

यानंतर शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी राणे यांच्यावर आक्षेपार्ह टीका केली. ते बुलढाण्यात आयोजित पत्रपरिषदेत बोलत होते. राज्यातील उद्योगधंद्यांकडे राणे यांनी लक्ष द्यावे. नसते उद्योग करू नये. शिवसेनेला लक्ष्य करून भुंकणे बंद करावे, ते फक्त शिवसेनेवर भूंकण्यासाठी आहेत, अशा शब्दात गायकवाड यांनी राणे यांच्यावर हल्लाबोल केला. यावेळी बुलढाणा जिल्ह्यातील चिखली शहरात ते बोलत होते.

महत्वाच्या बातम्या

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा