InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

राणी मुखर्जी पुन्हा बनणार ‘मर्दानी’!

बॉलिवूडची गुणी अभिनेत्री राणी लवकरच ‘मर्दानी’ या आपल्या गाजलेल्या चित्रपटाचा सीक्वल घेऊन येणार आहे. या चित्रपटात राणीने महिला पोलिस अधिकार्याच्या भूमिका साकारली होती.

२०१४ साली राणीची प्रमुख भूमिका असलेला ‘मर्दानी’ चित्रपट आला. या चित्रपटात पोलिसाच्या भूमिकेत असलेली राणी सर्वांनाच खूप आवडली. लहान मुलांचं सेक्स रॅकेट चालवणाऱ्या गँगचा पर्दाफाश करणाऱ्या डॅशिंग पोलिसाच्या भूमिकेतील राणीनं सगळ्यांच्याच प्रशंसा मिळवल्या.

बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट सुपरहिट ठरलाच पण त्याचबरोबर राणीच्या अभिनयाचंही खूप कौतुक झालं.म्हणूनच या चित्रपटाचा सिक्वल आणण्याचा विचार यशराज फिल्मनं केला आहे. बॉलिवूड हंगामाच्या माहितीनुसार पुढील वर्षांत या चित्रपटाचं चित्रिकरण सुरू होईल तर २०१९ च्या अखेरपर्यंत तो प्रदर्शित होणार आहे.

महत्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.