Ranjeet Savarkar | मोठी बातमी! रणजीत सावरकर राज ठाकरेंच्या भेटीला, राहुल गांधींच्या वक्तव्याबाबत चर्चा होण्याची शक्यता

Ranjeet Savarkar | मुंबई : राज्यात स्वातंत्र्यवीर सावरकर वाद चिघळत चालला आहे. राहुल गांधी यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर सावरकर यांचे नातू रणजीत सावरकर चांगलेच आक्रमक झाले आहेत. एवढंच नाही तर स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू रणजीत सावरकर (Ranjeet Savarkar) मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांना भेटणार असल्याची मोठी बातमी समोर येत आहे.

रणजीत सावरकर राज ठाकरेंना भेटायला जाणार असल्याचं समोर येताच अनेक राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. मात्र, ही भेट नेमकी कशासाठी होत आहे हे अद्याप समोर आलेलं नाहीये. मात्र, राज्यात चालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर ही भेट होत असल्याची शक्यता आहे.

सावरकर इंग्रजांकडून पेन्शन घ्यायचे. काँग्रेसच्या स्वातंत्र्य चळवळीच्या विरोधात जात ते इंग्रजांसोबत काम करायचे. सावरकर तुरुंगातून बाहेर आले तेव्हा खरे सावरकर सगळ्यांसमोर आले. सावरकरांनी इंग्रजांना पत्र लिहिली. त्यानंतर इंग्रजांनी त्यांना सोबत काम करण्याचं आमंत्रण दिलं. सावरकरांनी इंग्रजांसमोर हात जोडले आणि मी आपल्यासोबत काम करायला तयार आहे.तुमच्या अपेक्षेप्रमाणे मी काम करेन, असं वादग्रस्त वक्तव्य राहुल गांधी यांनी केलं होतं.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.