Ranji Trophy | IPL लिलावापूर्वी अजिंक्य रहाणेचे शानदार द्विशतक

Ranji Trophy | मुंबई: सध्या सुरू असलेल्या रणजी ट्रॉफी (Ranji Trophy ) मध्ये मुंबईच्या कर्णधार अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) ने हैदराबाद विरुद्ध द्विशतक झळकवले आहे. तर दुसरीकडे, आयपीएल (IPL) चा लिलाव (Auction) अवघ्या दोन दिवसांवर आला आहे. अशा परिस्थितीमध्ये लिलावात अजिंक्य राहण्याचे काय होईल? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कारण द्विशतक झळकावून अजिंक्यने सर्वांचे लक्ष आपल्याकडे खेचले आहे.

हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात पहिल्या दिवशी अजिंक्यने 139 नाबाद धावा केल्या. दरम्यान, अजिंक्यचा फॉर्म उत्कृष्ट असल्यामुळे तो दुसऱ्या दिवशी पण चांगली खेळी खेळलं असे जाणवत होते. तर फॉर्ममध्ये असलेल्या अजिंक्यने या सामन्यामध्ये द्विशतक झळकावत कमबॅक केला आहे.

हैदराबाद विरुद्धच्या सामन्यामध्ये मुंबईकडून पहिल्या दिवशी यशस्वी जयस्वालने 162 धावा केल्या होत्या. यशस्वी बाद झाल्यानंतर अजिंक्य मैदानावर उतरला होता. अजिंक्यने या सामन्यांमध्ये 139 नाबाद धावा केल्या. पहिल्या दिवशी अजिंक्यने आपली शतक पूर्ण केले होते. दरम्यान, अजिंक्य आणि सरफराज चौथ्या विकेटसाठी नाबाद 75 धावांची भागीदारी केली. या भागीदारीनंतर मुंबई दिवसाखेरपर्यंत 457 दिवसअखेर पर्यंत पोहोचली.

दुसऱ्या दिवशी अजिंक्य रहाणे आणि सरफराज खान यांनी आपला फॉर्म कायम ठेवला होता. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी 169 धावा केल्या. दरम्यान, अजिंक्य रहाणे द्विशतक ठोकले. अजिंक्य ने 261 चेंडू मध्ये 204 धावा केल्या. यामध्ये त्याने 26 चौकार आणि 3 षटकार मारले.

अजिंक्य रहाणेच्या या खेळीनंतर 23 डिसेंबर २०२२ रोजी कोची येथे होणाऱ्या आयपीएल मिनी लिलावामध्ये सर्वांचे लक्ष त्याच्याकडे राहील. दरम्यान, कोणता संघ अजिंक्यवर बोली लावेल याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

महत्वाच्या बातम्या

You might also like

Comments are closed.