रणवीर-दीपिका हॉस्पिटलबाहेर झाले स्पॉट; दीपिका देणार गुड न्युज?

मुंबई : बॉलिवूडमधील प्रसिद्ध कपल अभिनेता रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण यांनी 2018 साली विवाह करून चाहत्यांना सुखद धक्का दिला होता. दरम्यान आज शनिवारी मुंबईत रणवीर दीपिकाला घेऊन हॉस्पिटलमध्ये जाताना दिसला. यामुळे दीपिका आनंदाची बातमी देणार असल्याचं अनुमान त्यांच्या चाहत्यांनी लावलं आहे.

रणवीर स्वतः दीपिकाला मुंबईतील खार येथील हिंदुजा हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला होता. यावेळी काही मीडिया फोटोग्राफर्सनी त्यांना स्पॉट केलं.

दीपिका आणि रणवीरच्या विवाहानंतर त्यांचे चाहते या बातमीची आतुरतेने वाट पाहत आहेत. त्यामुळे दीपिका आणि रणवीरला पाहून काहींनी म्हटलं, ‘दीपिका गर्भवती आहे’, तर कोणी म्हटलं ‘अभिनंदन’, ‘छोटा रणवीर येणार’. तर काहींनी सांगितल दीपिका गर्भवती आहेच आणि ती रूटीन चेकअपसाठी आली आहे. तसेच अनेकांनी ते इतर काही कामासाठी किंवा चेकअपसाठी रुग्णालयात गेले असावेत असही म्हटलं.

दरम्यान दीपिका सध्या अभिनेता शाहरुख खानसोबत ‘पठाण’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. ज्यात ती ऍक्शन भूमिका साकारणार आहे. यासाठी तिने चांगली ट्रेनिंग देखील घेतली आहे.

महत्वाच्या बातम्या 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा