रणबीर कपूरने सोडलेल्या सिनेमांमुळे रणवीर सिंग झाला सुपरस्टार

आणि हे बॉलिवूडमधील दोन सुपरस्टार आहेत. या दोघांना पाहण्यासाठी त्यांचे चाहते चित्रपटगृहात गर्दी करतात. दोघांनीही एकाहून एक सरस सिनेमांत काम केलं आहे. फार कमी लोकांना हे माहीत आहे की, रणबीरने सिनेमा नाकारल्यानंतर तो सिनेमा रणवीरकडे गेला आणि त्या संधीचं रणवीरने सोनं केलं. या यादीत ‘गली बॉय’ सिनेमाही आहे.असं म्हटलं जातं की, दिग्दर्शिका झोया अख्तरला गली बॉय सिनेमात रणबीर कपूरने काम करावं अशी झोयाची इच्छा होती. पण, काही कारणांमुळे रणबीरने हा सिनेमा नाकारला. त्यानंतर रणवीरकडे ही भूमिका गेली.

‘रणवीर सिंगसाठी 2018 हे वर्ष फार खास होतं. गेल्या वर्षी त्याच्या नावावर रोहित शेट्टीचा ‘सिंबा’ आणि संजय लीला भन्साळी यांचा ‘पद्मावत’ या दोन सुपरहिट सिनेमांची नोंद झाली.असं म्हटलं जातं की, संजय लीला भन्साळी यांनी खिलजीच्या भूमिकेसाठी सुरुवातीला रणबीरला विचारलं होतं. मात्र रणबीरने ही भूमिका करायला स्पष्ट नकार दिला. रणबीरने संजय लीला भन्साळी यांच्या ‘सावरिया’ सिनेमातून सिनेकरिअरला सुरुवात केली. या सिनेमाकडून अनेकांना अपेक्षा होत्या. मात्र हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर दणदणीत आपटला होता. या सिनेमानंतर रणबीरने भन्साळींसोबत काम न करण्याचा निर्णय घेतला.

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.