रणवीर सिंहने सांगितला ‘बाजीराव मस्तानी’ सिनेमाच्या शूटिंग दरम्यान घडलेला भयानक अनुभव

मुंबई : बॉलीवूडमधील बाजीराव रणवीर सिंह आपल्या अभिनयाने सर्वांचे मन तर जिंकतच राहतो पण त्याने आपले एक वेगळेच स्थान निर्माण केले आहे. रणवीर सिंहच्या ‘बाजीराव मस्तानी’ या सिनेमातून रणवीरच्या अभिनयाचं प्रचंड कौतुक झालं. या सिनेमाच्या शूटिंग दरम्यान मात्र रणवीरला काही भयानक अनुभव आले आहेत.

रणवीर सिंहने एका मुलाखतीत ‘बाजीराव मस्तानी’ सिनेमाच्या सेटवर त्याला भूत दिसल्याचा दावा केला होता. एका मुलाखतीत रणवीरने या अनुभवाचा खुलासा केला होता. “याआधी मी कधीच आत्मा आणि भूत यावर विश्वास ठेवत नव्हतो. मात्र त्या दिवसापासून मी खूप घाबरलो होतो. माझ्यासाठी शूटिंगचे ते सर्वात कठीण दिवस होते. सतत माझ्या आजुबाजूला कुणी तरी असल्याचं मला जाणवत होतं. ते बाजीराव असल्यासारखं मला जाणवतं होतं. मी सतत विचार करत होतो की जर मला खरचं बाजीराव पेशवे यांची आत्मा दिसली तर… मला माहित नाही मी असा विचार का करत होतो..पण काही दिवसातच हे प्रत्यक्षात घडलं. माझ्या कानात कुणीतरी मी तोच बाजीराव आहे असं कुजबुजल्याचं मला जाणवलं” असं रणवीर म्हणाला.

पुढे या मुलाखतीत तो म्हणाला, ” सेटवर तिथेच एक काळ्या रंगाची भिंत होती. या भिंतीवर पांढरी धूळ जमा झाल्याने एक विशिष्ट आकृती तयार झाली होती. तिच पगडी, तेच डोळे, मिश्या अगदी तोच रुबाब..ती हुबेहुब बाजीराव पेशव्यांची आकृती होती.” हा अनुभव सांगताना रणवीर म्हणाला की सेटवर त्याने ही आकृती अनेकांनी दाखवली सुद्धा. यावर अनेकांनी ती आकृती बाजीराव पेशव्यांसारखीच दिसत असल्याचं मान्य केलं होतं. असा घातलेला भयंकर अनुभव रणवीरने सांगितला.

महत्वाच्या बातम्या

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा