Raosaheb Danve | महाराष्ट्रात खरंच मध्यावधी निवडणुका लागणार? रावसाहेब दानवेंची प्रतिक्रिया

Raosaheb Danve | मुंबई : राज्यात लवकरच मध्यावधी निवडणूकांना होणार असल्याची घोषणा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केली होती. यानंतर संपुर्ण राज्याचं लक्ष या निवडणूकांकडे लागलं आहे. अशातच भाजप (BJP) पक्षाचे नेते रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

यावेळी, महाविकास आघाडीचे सरकार जाईल असे कुणालाही वाटत नव्हते. मात्र अशी जादू झाली की अडीच वर्षात सरकार कोसळले. यामुळे उद्या नेमकी राजकीय परिस्थिती काय असेल याचा अंदाज बांधता येत नाही. सध्याची राजकीय परिस्थिती गोंधळलेली आहे. कधी काय होईल याचा नेम नाही. त्यामुळे जनतेची कामे करा, असं रावसाहेब दानवे यांनी म्हटलं आहे.

तसेच, भाजपचे गृहमंत्री अमित शाह आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची बंद दाराआड चर्चा झाल्यानंतरच शिवसेना-भाजप युतीत लोकसभा, विधानसभा निवडणुका झाल्या. निकाल लागल्यानंतर आपल्याशिवाय भाजप राज्यात सरकार बनवू शकत नाही, असे लक्षात आल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी भाजपला सोडून महाविकास आघाडी केली, असं देखील ते म्हणाले.

दरम्यान, पूर्वी राजा पोटातून जन्माला यायचा, आता मतपेटीतून राजा निवडला जातो. राजकारणात तुमच्या अंगात किती सोने असेल, पण तुमच्यासोबत लोक नसतील तर तुम्हाला काहीच किंमत नाही. यासाठी राजकारण करायचे असेल तर तुमच्यासोबत लोक असली पाहिजेत, असं रावसाहेब दानवे यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.