Raosaheb Danve | 2024 निवडणुकीनंतर महाविकास आघाडीत फूट पडणार; रावसाहेब दानवे यांचं भाकीत

Raosaheb Danve | टीम महाराष्ट्र देशा: महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाच्या निकालानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या निर्णयानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहे. अशात भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी महाविकास आघाडीवर टीकास्त्र चालवलं आहे. 2024 निवडणुकीपर्यंत महाविकास आघाडीत फूट पडणार आहे, असं भाकीत रावसाहेब दानवे यांनी केलं आहे.

माध्यमांशी बोलताना रावसाहेब दानवे म्हणाले, “महाविकास आघाडीच्या कितीही बैठका होऊ द्या. त्याचबरोबर त्यांचे कितीही दौरे होऊ द्या. मात्र, 2024 मध्ये देशात आणि राज्यात पुन्हा मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपचे सरकार येणार आहे. तिसऱ्या आघाडीचा प्रयत्न याआधी दोन वेळा झाला आहे. दोन्ही वेळा तो अपयशी ठरला आहे.”

पुढे बोलताना दानवे म्हणाले, “महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष येत्या लोकसभा निवडणुकीपर्यंत एकत्र राहतील. निवडणुका आधी पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण असेल? यावरून त्यांच्यात फूट पडणार. हे कुणीही एकत्र येत नाही. एकत्र आले तरी आम्हाला काहीही फरक पडत नाही.

रावसाहेब दानवेंच्या या वक्तव्यानंतर संजय राऊत यांनी दानवेंवर निशाणा साधला आहे. रावसाहेब दानवेंवर निशाणा साधत संजय राऊत म्हणाले, “रावसाहेब दानवे यांनी पुन्हा निवडून येऊन दाखवावं. येत्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी त्यांचा पराभव करणार आहे. आता लवकरच आम्ही मराठवाडा दौरा करणार आहोत.

महत्वाच्या बातम्या

Original NEWS SOURCE – https://bit.ly/3pOs3bk

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.