InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

रावसाहेब दानवेंनी युतीधर्माऐवजी जावईधर्म पाळला – चंद्रकांत खैरे

लोकसभा निवडणुकीचा निकाल येण्याआधीच शिवसेना-भाजप युतीमध्ये आरोप- प्रत्यारोपाचे राजकारण सुरू झाले आहे. औरंगाबादचे महायुतीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांनी रावसाहेब दानवे यांनी युतीधर्म पाळला नसल्याचा आरोप केला आहे.

औरंगाबाद मतदारसंघातून चंद्रकांत खैरे यांच्या विरूध्द रावसाहेब दानवे यांचे जावई आणि शिव स्वराज्य पक्षाचे आमदार हर्षवर्धन जाधव हे देखील रिंगणात उतरले. यावरून चंद्रकांत खैरे यांनी रावसाहेब दानवेंवर निशाणा साधला आहे.

‘भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी युती धर्मऐवजी जावई धर्म पाळला, रावसाहेब दानवेंना खुश करण्यासाठी औरंगाबादमधील भाजपच्या 8 ते 10 नगरसेवकांनीही आपल्याविरुद्ध हर्षवर्धन जाधव यांचं काम केलं. जाधव यांनी खालच्या पातळीवर जाऊन आपल्याविरुद्ध प्रचार केला. त्यामुळे रावसाहेब दानवे आणि त्यांचे जावई हर्षवर्धन जाधव यांना आवरा,” असं अमित शाहांकडे केलेल्यात तक्रारीत खैरेंनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.