“शिवसेनेचा हा सक्षम नेता हे राज्य चालवू शकतो, पण…”, रावसाहेब दानवे यांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप

मुंबई : राज्यात हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षांनी सरकारला घेरण्याची तयारी केली होता. काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर मणक्याची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना डॉक्टरांनी आराम करण्याचा सल्ला दिला होता. त्यामुळे ते अधिवेशनाला उपस्थित राहू शकले नाहीत. यानंतर भाजपकडून प्रकृती बरी नसल्यामुळे कारभार सांभाळता येत नसेल तर उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाचा चार्ज दुसऱ्या कोणाकडे तरी द्यावा, अशी मागणी होत आहे.

याच मुद्द्यावरून आता केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आजारी आहेत. मुख्यमंत्र्यांना बरे होण्यासाठी काही दिवस लागतील पण राज्यातील कारभार कसा चालणार असा प्रश्न रावसाहेब दानवे यांनी उपस्थित केला आहे. तसेच शिवसेना नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासारखा माणूस राज्य सरकार चालवू शकतात पण त्यांच्याकडे जबाबदारी दिली जात नसल्याचा आरोप दानवेंनी केला आहे.

यानंतर पुढे रावसाहेब दानवे यांनी, विना प्रमुखाचं हे राज्य कसं चालेल, असा सवाल उपस्थित करत उद्धव ठाकरेंना खोचक टोला लगावला आहे. तसेच एकनाथ शिंदेंसारखा सक्षम माणूस हे राज्य चालवू शकतो, पण तरीही त्यांच्याकडे जबाबदारी दिली जात नाही. कुणालाही द्या, राष्ट्रवादीला द्या, अजित पवारांना द्या. संधी दिली पाहिजे, असंही रावसाहेब दानवे यांनी नमूद केलं आहे.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या